एक्स्प्लोर

व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून 15 लाखांच्यां खंडणीची मागणी, बीडमध्ये हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश!

बीडमध्ये एका व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये फसवून त्याच्याकडून 15 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. वीट खरेदीच्या व्यवहाराबाबत महिलेने व्यापाऱ्याला एका ठिकाणी बोलावलं आणि तिथेच हा व्यापारी फसला. मात्र या व्यापाऱ्याच्या मित्राच्या सहाय्याने पोलिसांनी या गँगचा पर्दाफाश केला.

बीड : बीड जिल्ह्यात हनीट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल पंधरा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलही करण्यात आलं. या हनीट्रॅप गॅंगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

कसे घडले हनीट्रॅप? आष्टी येथील एका महिलेने केज तालुक्यातील टाकळी इथला वीटभट्टीचा चालक असलेल्या नितीन बारगजे यांना फोन केला. तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत असे सांगून मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणी महिलेसोबत विट खरेदीसंदर्भात बोलणी झाली.

पहिल्या भेटीमध्येच या महिलेने व्यापाऱ्याला हेरले. विटा खरेदीसंदर्भातल्या व्यवहाराची बोलणी झाल्यानंतर, या महिलेने नितीन बारगजे यांना 'माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा,' अशी विनवणी केली. त्यानुसार बारगजे पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पाटोदापर्यंत सोडल्यानंतर पुढे माझ्या आरती गावापर्यंत सोडता का? असे या महिलेने व्यापाऱ्याला विचारलं. आधी मांजरसुंबा त्यानंतर पाटोदा आणि त्यानंतर नितीन बारगजे यांनी या महिलेला घरी सोडले.

घरी गेल्यानंतर महिलेने नितीन बारगजे यांना चहापाण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनीही चहा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यास एका रुममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केली. त्याचा व्हिडीओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडीओ आम्ही व्हायरल करु, असा दम देत त्याला मारहाण करत 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानुसार 10 लाख रुपये देतो, त्यासाठी माझी शेती विकतो, असं नितीन बारगजेने सांगितलं.

दहा लाख रुपये देण्याच्या अटीवर नितीन बारगजे यांना सोडण्याचे निश्चित झाले. त्यानंतर त्या महिलेने बारगजे यांच्यासोबत एकाला मोटरसायकलवर केजपर्यंत पाठवले. आपण पूर्णपणे अडकल्याची जाणीव झाल्यानंतर बारगजे यांनी केजमधल्या आपल्या मित्र-परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसणे मागितले. अचानक दहा लाख रुपये कशाला हवेत? असा प्रश्‍न काही मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय त्यांना आला.

त्यानंतर बारगजे आणि त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग केली. आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीला विश्वासात घेत 'तुमचे अन्य लोकांना पैशांसाठी बोलवा, व्हिडीओ क्लिप डिलिट करुन प्रश्‍न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू', असे म्हटल्यानंतर संबंधिताने आपल्या साथीदारांना केजमध्ये बोलवून घेतले. तिघे जण स्कॉर्पिओमध्ये आले. या घटनेची माहिती केज पोलिसांना तत्पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या शेखर पाठक याला पोलिसांनी अटक केली.

मित्राच्या मदतीने हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश या प्रकरणामध्ये एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून बाकी फरार आहेत. नितीन बारगजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्याविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राच्या साहाय्याने नितीन बारगजे यांनी पोलिसांना सगळी माहिती दिल्याने हानीट्रॅपच्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Embed widget