(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna : समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना अटक; एका आरोपीचा तपास सुरु
Jalna Ram Mandir Theft : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत.
Jalna Ram Mandir Theft : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या आहेत. जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक
समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी आता कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फाफर आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती काही हजार रुपयांना विकल्या होत्या. या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत सुरु आहे. पोलीस महसंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली जाणार आहे.
25 हजारांना विकल्या ऐतिहासिक मूर्ती
चोरीला गेलेल्या ऐतिहासिक मूर्तींपैकी काही मूर्ती पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती 25 हजारात विकल्या होत्या. या मूर्ती चोरी प्रकरणी तपासात पोलिसांना दोन महिन्यांतर मोठं यश आलं आहे. ऑगस्ट महिन्यात मूर्ती चोरीला गेल्या होत्या. या घटनेचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले होते. 22 ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या राम मूर्तीचा तपास आधी जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला.
मुख्य आरोपीचा शोध सुरु
पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींनी अटक केली असून यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक ऐतिहासिक मूर्ती परत मिळवली आहे. अटक झालेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी चोरी करण्यात सामील होता, तर दुसरा आरोपी हा चोरी खरेदी-विक्रीमध्ये सामील होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. फरार आरोपीकडे इतर ऐतिहासिक मूर्ती असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.