एक्स्प्लोर

एबीपी माझाच्या बातमीची दखल! पालखी मार्गावरील ऐतिहासीक विहिरीचं जतन होणार, केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आदेश

ऐतिहासिक विहिरीचे जतन करत तिला धक्का न लागता मार्ग काढण्याच्या सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबई : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रुंदीकरणात 1811 सालातील ऐतिहासिक 'बाजीराव विहीर' येत असल्याने तिचे संवर्धन व्हावे यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. याची दखल घेत या ऐतिहासिक विहिरीचे जतन करत तिला धक्का न लागता मार्ग काढण्याच्या सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान या विहिरीचा इतिहास आता नव्याने समोर आला असून या विहिरीचे बांधकाम 1811 साली झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. दुसरे बाजीराव पेशवे आषाढी वारीसाठी पंढरपूरला नियमित वारीला येत असताना त्यांनी ही विहीर व 15 बिघे जमीन त्या काळातील सरदार खाजगीवाले यांचेकडून घेत ती विठ्ठल मंदिराला दिली होती. विठुरायाला रोज लागणाऱ्या तुळशी व फुलांची सोय या विहिरीच्या पाण्यावर शेजारील जमिनीत करून त्याचा वापर देवासाठी करावा अशी बाजीराव पेशवे यांची संकल्पना होती. त्यानुसार त्यांनी या जमीन व विहिरीच्या बदल्यात खाजगीवाले यांना 15 बिघे जमीन देताना विहिरीचे वेगळे 400 रुपये दिल्याचे पुरावे समोर आले आहेत . त्यामुळे ही विहीर थेट विठ्ठलाची विहीर अशी त्याकाळी ओळखली जात असल्याचे इतिहास अभ्यासक व मोडी लिपीचे तज्ज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले आहे. याबाबतचे सर्व पुरावे मेमाणे यांच्याकडे असून त्यांनी याबाबतचे एक पत्र पुरातत्व विभागाला लिहिल्यावर पुरातत्व विभागाने ही विहीर पुरातन असल्याचे मान्य करीत रस्त्याच्या बांधकामात पडली जाऊ नये अशी विनंती करणारे पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

सध्या वारकरी संप्रदायासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग 965 अर्थात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेतले आहे. याच कामातील सर्व्हिस रोडमध्ये ही विठुरायाची विहीर येत असल्याने अधिकाऱ्यांनी ती पडण्याची तयारी चालवली होती. याच जागी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होत असून वर्षानुवर्षे हे रिंगण बाजीराव विहीर रिंगण म्हणून ओळखले जाते. देवाची ही आखीव रेखीव बांधलेली विहीर वाचवण्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती.

संबंधित बातम्या :

पालखी मार्गावरील 1811 सालातील बाजीराव विहिरीचा इतिहास नव्याने समोर, विहीर वाचवण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा पुढाकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..Ajit Pawar in Pune Festival : पुणे फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात अजित पवार यांची फटकेबाजीEknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती -  खडसेZero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget