एक्स्प्लोर
बँकेत 40 लाखांचा दरोडा, 5 तासांच्या थरारानंतर चोरटे जेरबंद
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये बुधरावी भरदिवसा दरोड्याचा थरार पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या गाडीतून 40 लाख रुपये घेऊन चोरटे फरार झाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करत चोरट्यांनी धूम ठोकली.
बँकेच्या कर्मचारी अश्विनी जायभाय यांनी प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी फोन लावला. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत स्थानिकांनी मदतीचं आवाहन केलं. पोलिस आणि ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी दगडफेक आणि गोळीबार केला. पण, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या चपळाईने चोरट्यांना पकडलं आणि 5 तासांच्या थरारानंतर चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं.
नेमकं काय घडलं?
सेनगावमधील स्टेट बँक ऑफ हैदराबादसमोर बुधवारी दुपारी 12 वाजता एक इंडिका कार येऊन थांबली. गाडीत असलेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी कर्मचारी तयारी करत होते. इतक्यात तिघे जण इंडिकाच्या दिशेने आले आणि कर्मचाऱ्यांच्या गळ्यावर चाकू लावून गाडीतील 40 लाख रुपये लुटले. तर दोन दरोडेखोर त्यांनी सोबत आणलेल्या सुमो गाडीतच होते.
या झटापटीत दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करुन जखमी केले. तर बँकेच्या कर्मचारी अश्विनी जायभाय आणि सेवक गणेश चंदेल यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमो गाडीतून आरोपी पसार झाले. यानंतर अश्विनी जायभाय यांनी तात्काळ संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली.
असा रंगला थरार!
सूचना मिळताच पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. दरोडेखोरांच्या शोधासाठी एक पथक पाठवून दुसऱ्या गावातील गावकऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना देऊन मदतीची हाक दिली. ग्रामस्थांनी पोलिसांच्या हाकेला साद देत दरोडेखोरांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या थरारात दरोडेखोरांनी गावकऱ्यांवर दगडफेक केली. तसंच हवेत गोळीबार केला. मात्र गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरुच ठेवला. अखेर तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश आलं.
पोलिसांनी 5 पैकी 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 40 लाख रुपयांपैकी 39 लाख रुपये जप्त केले. तसंच जिवंत काडतूस, पिस्तूलसह, चाकू आणि घातक हत्यारही ताब्यात घेण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement