एक्स्प्लोर
हिंगोलीतील बेपत्ता PSI नांदेडमध्ये सापडले!
बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक तानाजी चेरले हे 10 सप्टेंबरपासून बेपत्ता होते.
हिंगोली : बाळापूर पोलिस ठाण्यातील बेपत्ता झालेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) तानाजी चेरले नांदेडमधील दवाखान्यात सापडले आहेत. कळमनुरीचे ठाणेदार गणपत राहिरे यांनी चेरलेंचा शोध लावला.
बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे 10 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.
तानाजी चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आपले पती बाळापूरचे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हिंगोलीपासून ते मुंबईपर्यंतच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ माजली होती. फौजदार चेरले निघून जाण्यामागचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्या शंकांचे निरसन होणार आहे.
कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी बेपत्ता फौजदाराचा शोध लावला. नांदेड येथील तरोडा नाका भागात असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये तानाजी चेरले उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यावर फौजदार चेरले यांना आणण्यासाठी गणपत राहिरे यांनी मध्यरात्रीच नांदेड गाठले. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन सकाळी चार वाजता त्यांना घेऊन कळमनुरी येथे हजर झाले आहेत. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासमोर फौजदार चेरले यांना उपस्थित केले जाणार असून त्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement