देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरुन दोन गटात तुफान राडा, लाठ्या काठ्या आणि दगडफेक, पाच ते सहा जण गंभीर जखमी
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरुन दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वेलतुरा गावात ही घटना घडली आहे.
Hingoli News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरुन दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वेलतुरा गावात ही घटना घडली आहे. या मारहाणीत लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत गावातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी
देवीच्या विसर्जन मिरवणुकीच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. गावात आज देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. ही विसर्जन मिरवणूक गावातल्या मारुती मंदिराजवळ जवळ आल्यानंतर घोषणा देताना हा वाद झाला आहे. त्यामुळे वेलतुरा गावातील दोन गट यावेळी आमने-सामने आले. यावेळी लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत त्यांच्या मध्ये ही तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये गावातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गावात आता तणाव पूर्ण शांतता आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवरात्र हा देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक हिंदू सण
महत्वाच्या बातम्या:























