एक्स्प्लोर

विजेसाठी ग्रामस्थांचा भर पावसात रात्री रोहित्राजवळ ठिय्या, १२ दिवसापासून खांबाळा गाव अंधारात

Hingoli News: नव्याने आणलेले रोहित्र बसवताच ते जळाले असून महावितरणने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले. वसमतच्या खंबाळा गावात ग्रामस्थांनी शनिवारी रात्री भरपावसात ठिय्या आंदोलन केले.

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा गावामध्ये वीजपुरवठा होत नसल्याने आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी विद्युत रोहित्राजवळ रात्री ठिय्या आंदोलन केले आहे. वसमत तालुक्यातील खांबाळा गावांमध्ये मागील बारा दिवसापासून वीज पुरवठा होत नसून नागरिकांना भर पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

खांबाळा गावात दहा ते बारा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. नव्याने आणलेले रोहित्र बसवताच ते जळाले असून महावितरणने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले असून संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री महिला व लहान मुलांसह थेट रोहित्राजवळच भरपावसात ठिय्या आंदोलन केले.

महावितरणणे रोहित्र बसवले खरे..

वसमत तालुक्यातील खांबाळा येथील रोहित्र गत १० ते १२ दिवसांपूर्वी जळाले होते. महावितरणकडे नवीन रोहित्र बसविण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. रोहित्रासाठी रक्कम मोजावी लागेल, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगताच ग्रामस्थांनी रक्कम जमा करून १० जुलै रोजी नवीन रोहित्र आणले व बसविण्यात आले.

अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच

परंतु, वीजपुरवठा सुरळीत करताच नव्याने बसवण्यात आलेले रोहित्रही जळाले. त्यामुळे दुसरे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, जोपर्यंत अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

यादरम्यान वसमत तालुक्यातील वापटी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे अभियंता राजू नंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी बोलण्याचे टाळले, असेही आंदोलकांनी सांगितले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दूर्लक्ष

महावितरणचे अधिकारी व अभियंता यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात मागील १० ते १२ दिवसांपासून अंधार आहे.  त्यामुळे ग्रामस्थांनी भ्ज्ञरपावसात टॉर्च सुरु करत रोहित्राखालीच आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या आंदोलनात महिला व लहान मुलांना घेऊन नागरिक आंदोलनास जमले होते.

महावितरणकडून बीलाची वसूली दर महिन्याला अगदी १०० टक्के होत असते. मात्र, गाव १२ दिवसांपासून अंधारात असल्याचे सांगण्यात आल्यानंतर खंबाळावासींनी महावितरणविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

हेही वाचा:

हिंगोलीत काँग्रेसचं पारडं जड! विधानपरिषद निवडणूकीत आमदार प्रज्ञाताईंच्या विजयाने काँग्रेसला प्रतिनिधित्व

20 तारखेला पुन्हा उपोषण, त्याच दिवशी मोठी घोषणा; मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget