एक्स्प्लोर
कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण
कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

मुंबई : केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकणातल्या समुद्रांनी काल रात्री रौद्ररुप धारण केलं. कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार, आजपासून 6 तारखेपर्यंत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. UPDATE :
- रायगड - ओखी वादळाचा फटका रायगड समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. उरण समुद्रकिनारी 4 ते 5 छोट्या बोटी बुडाल्या. सुदैवाने बोटीत कुणीही नव्हतं. काल रात्रीची ही घटना आहे. बुडालेल्या बोटी परत किनाऱ्यावर आणल्या आहेत. एक बोट माणकेश्वर किनाऱ्यावर बुडाली. किनाऱ्यावरील बोटी आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.
- रायगड - उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा बंद, ओखी वादळाच्या इशाऱ्याने सेवा बंद करण्याचा निर्णय
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























