एक्स्प्लोर

Mumbai Crime: गौरीशी लग्न होऊनही विवाहबाह्य संबंध, लातूरच्या हॉस्पिटमधील गर्भपाताच्या संमतीपत्रावर अनंत गर्जेंचा नवरा म्हणून उल्लेख, 'ती' कागदपत्रं पाहून गौरीच्या पायाखालची जमीन सरकली

Gauri Garje and Anant Garje: वरळी पोलिसांनी गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Anant Garje & Gauri Garje Suicide news: राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे 10 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी आत्महत्या केल्याचे समजते. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या (Suicide news) केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे गौरी पालवे गर्जे यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. अखेर रविवारी वरळी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai news)

वरळी पोलिसांनी गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गौरी पालवे यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. यामध्ये अनंत गर्जे यांच्यासह गौरी पालवे यांची नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांचा समावेश असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला होता. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही गौरीच्या वडिलांनी केला होता. याआधारे आता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. तर अनंत गर्जे अद्याप कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, अनंत गर्जे यांनी मी घरात नसताना आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता पोलीस अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करणार का, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

गौरीच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई करायला का सांगितलं नाही? अंजली दमानियांचा सवाल, वरळी पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचल्या अन्...

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget