एक्स्प्लोर

Kolhapur Crime : गडहिंग्लज तालुक्यात मेंढपाळ बापासह तीन वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; हल्लेखोरांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात तुपूरवाडीत मेंढपाळासह त्याच्या वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. मृत बाप लेक कर्नाटकमधील जोडकुरळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या ठिकाणचे आहेत.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात तुपूरवाडीत मेंढपाळासह त्याच्या वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. मृत बाप लेक कर्नाटकमधील जोडकुरळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या ठिकाणचे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. 

केंचाप्पा मारुती हारके (वय 37) व मुलगा शंकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. दोन नोव्हेंबरपासून हारके तुपूरवाडीत  हद्दीतील रिकाम्या शेतवडीत बकऱ्‍यांचा कळप घेऊन आले होते. दरम्यान, काल सकाळी केंचाप्पा यांची पत्नी श्रीदेवी लहान मुलीला घेऊन  कपडे धुण्यासाठी गेली असताना केंचाप्पा, मुलगा शंकर व नातेवाईकांच्या कुटुंबातील काही सदस्य त्या ठिकाणी होते. मात्र, परत आल्यानंतर तिला कोणीच दिसत नसल्याने पती व मुलाचा शोध घेतला. मात्र, त्याच ठिकाणी असेल म्हणून परत आपल्या कामाला लागली. 

शेतवडीत कुठे तरी गेले असतील म्हणून ती तळावरच आपल्या कामात मग्न झाली. दरम्यान, हल्लेखोराने आपल्या भावाला केंचाप्पाशी भांडण झाल्याचे सांगितले. त्याने दुसऱ्या मेंढपाळाला सांगून माहिती घेतली असता चिमुकला शंकर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले. केंचाप्पाही गवतामध्येच रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता. 

त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार झाल्याने चेहऱ्‍यासह संपूर्ण शरीर, कपडे व आसपासचे गवत रक्ताने माखले होते. केंचाप्पा जागीच ठार झाला होता. हल्लेखोराच्या भावाने मृत केंचाप्पाच्या भावांना माहिती दिल्यानंतर ते आणि इतर नातेवाईक सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. 

माहिती मिळताच तुपूरवाडी, कडाल, मुंगूरवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्यासह आजरा, नेसरीचे पोलिस अधिकारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. शेळकेयांनी केंचाप्पाची पत्नी, भाऊ यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी केंचाप्पाची पत्नी श्रीदेवीने गुरुवारी रात्री बिराप्पा संकरट्टी व केंचाप्पा यांच्यात वाद झाल्याची माहिती शेळके यांना दिली. याच वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बिराप्पा सापडल्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे शेळके यांनी सांगितले. नेसरी पोलिसात शंकरच्या मृताची नोंद झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget