एक्स्प्लोर
भिवंडीत वाहतूक कोंडी, वाहनांच्या 10 किमी रांगा

भिवंडी : भिवंडीमधील कशेळी परिसरात झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाळूचा ट्रकच्या अपघातामुळे परिसरात वाहनांच्या तब्बल 10 किमी लांबीच्या रांगा लागल्या आहेत. कापूरबावडी ते भिवंडी आणि खारीगाव टोलनाका ते भिवंडी अशा दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहे. सध्या पोलिसांकडून रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























