एक्स्प्लोर

मुंबई, उपनगरात अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका

मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबरोबरच रायगड आणि पालघरमध्येही अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. तर, मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून ग्रामस्थ आणि जनावरांचं स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. संभाव्य धोका ओळखून चिखली गावातल्या ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनीही स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला कोल्हापूरवर पुराचं संकट घोंगावत असताना , कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगेची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा वाढलेला जोर पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अलमट्टीमधून होणार विसर्ग 50 हजार क्युसेकने वाढवला आहे. सांगलीत एनडीआरएफची पथकं तैनात साताऱ्यातही येत्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना धरणातून वाढलेला विसर्ग पाहता कृष्णा नदीची पाणीपातळी 34 ते 35 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडले आहेत. महाबळेश्वरने चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत 240 इंच पाऊस झाला आहे तर मौसिनराम इथे 245 इंच पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा जवळपास 70 टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. तर 300 गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यात नाला ओलांडताना 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वर्ध्यात तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातील बाऱ्हा गावातल्या तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाऱ्हा गावातील 42 कुटुंबातील 150 जणांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे हे तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर पाटबंधारे विभागाकडून या तलावाची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget