एक्स्प्लोर
उकाड्यानं नागपूरकर हैराण, इस्त्रीचे कपडे चक्क फ्रीजमध्ये!
नागपूर: गेल्या चार दिवसांपासून विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. पण त्यावर उतारा म्हणून नागपूरकरांनी भन्नाट आयडिया शोधल्या आहेत.
विदर्भात सध्या पाऱ्यानं पंचेचाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळावा म्हणून काही जण चक्क अंघोळीचं पाणी फ्रीजमध्ये ठेवत आहेत. कारण नळातल्या पाण्यानं चटका बसतो! बरं पाणी फ्रीजमध्ये ठेवणं एकवेळ समजू शकतो. पण वाढत्या तापमानामुळे कपडेही फ्रीजमध्ये ठेवण्याची वेळ नागपूरकरांवर आली आहे.
इस्त्रीचे कपडे चक्क फ्रीजमध्ये!
नागपूरच्या शिवाली महाजनने उकाड्यापासून बचाव यासाठी एक भन्नाट कल्पना वापरली. प्रचंड उकाड्यात जर बाहेर पडायचं असेल तर शिवाली आपले इस्त्री केलेले कपडे काही तास आधी प्लास्टिकमधे पॅक करुन फ्रीजमध्ये ठेवते. बाहेर पडताना ते कपडे परिधान करायचे म्हणजे काही वेळ तरी जीवाची काहिली होत नाही. असं शिवालीचं म्हणणं आहे.
वाशिममध्ये सुती मास्क विक्रीला
विदर्भातल्या रस्त्यावर फिरायचं असेल तर चेहऱ्यावर कपडा बांधल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येत नाही. मात्र वाशिममधे आत सुती मास्क चक्क विक्रीसाठी आले आहेत. दुसरीकडे अनेकांनी काही पारंपारिक उपायही करणं सुरु केलं आहे. उकाडा असह्य होऊ नये म्हणून काही जणांनी चक्क आपल्या कारमध्ये कांदाही ठेवला आहे.
उन्हाळा असो हिवाळा असो वा पावसाळा. शेगावच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ असते. पण आता हिट व्हेवचा फटका भाविकांना बसू नये म्हणून प्रदक्षिणा भागात रबर पेंटचा पांढरा पट्टा मारला आहे.
एकूणच उकाड्यापासून बचाव व्हावा यासाठी विदर्भवासिय भन्नाट कल्पना वापरताना दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement