एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

खेडच्या शेतकऱ्याचं हृदय दिल्लीच्या तरुणाला!

पुणे :  'मरावे परी किर्तीरुपी उरावे' याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला. खेडच्या एका 23 वर्षीय शेतकऱ्याने दिल्लीच्या 24 वर्षीय तरुणाला जीवदान दिलं आहे.  या अन्नदात्याचा ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचं हृदय दिल्लीच्या तरुणाला देण्यात आलं. इतकंच नाही तर यकृत आणि किडनीही दान करून अन्य तिघांचेही प्राण वाचवले. त्यामुळे खेडचा हा 'अन्नदाता' खरोखरच जीवनदाता बनला.   दुसरीकडे पुणे ते दिल्ली असा जिवंत हृदयाचा धडधडता प्रवास पुणेकरांनी अनुभवला.   काय आहे प्रकरण?   खेडच्या एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा अपघात झाला होता. 19 एप्रिलला झालेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने, त्याला ब्रेनडेड घोषीत करण्यात आलं.   तरण्याबांड तरुणाचा हा आघात कुटुंबीयांना सहन न करण्यासारखा होता. मात्र अशावेळीही त्यांनी धीरोदत्तपणा दाखवला. नातेवाईकांनी त्याचे डोळे, मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला.   या निर्णयानंतर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने तत्परतेने हालचाली सुरु केल्या.   ब्रेन डेड झालेल्या या जीवनादात्याचं धडधडतं हृदय गरजू रुग्णाला बसवण्याच्या ठरवण्यात आलं. मात्र हा गरजवंत होता पुण्यापासून जवळपास 1500 किलोमीटर दूर राजधानी दिल्लीत. खेडच्या शेतकऱ्याचं हृदय दिल्लीच्या तरुणाला! पोलिसांची मदत   धडधडतं हृदय पुण्याहून दिल्लीला पोहोचवण्याचा रुबी हॉल क्लिनिकचा निर्णय झाला. मात्र इतका मोठा प्रवास अत्यल्पवेळेत पूर्ण करणं आवश्यक होतं. त्यासाठी रुबी हॉल क्लिनिक ते पुणे विमानतळ आणि तिथून दिल्ली हा प्रवास सोपा नव्हता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने यासाठी पोलिसांची मदत घेतली.   'ग्रीन कॉरिडॉर' रुबी हॉल क्लिनिक ते लोहगाव विमानतळ हे 7.8 किमीचं अंतर पार करण्यासाठी पुणे पोलिसांनी "ग्रीन कॉरिडॉर‘ तयार केला. पोलिसांनी कंबर कसून आपला ताफा रस्त्यावर उतरवला आणि हे अंतर अवघ्या साडेसहा मिनिटात पार केलं. रखरखत्या उन्हात भर दुपारी हा थरार पुण्याच्या रस्त्यावर सुरु होता.   एरव्ही हेच अंतर पूर्ण करण्यासाठी सुमारे अर्धा तास आणि त्यापेक्षाही अधिक वेळ लागतो.   दिल्लीहून पुण्यात आलेल्या 'एम्स'च्या वैद्यकीय पथकाने दुपारी साडेतीन वाजता धडधडतं हृदय घेऊन दिल्लीकडे कूच केली.   यकृत महिलेला, किडनी अन्य गरजूंना एकीकडे धडधडतं हृदय दिल्लीला पाठवलं, तर दुसरीकडे या जीवनदात्याचं यकृत रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या 50 वर्षीय महिलेला देण्यात आलं. तर त्याच्या किडन्या दोन रुग्णांना बहाल करण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget