एक्स्प्लोर
केंद्राकडे 5 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी केल्यानंतर फक्त 277 मिळाले : आरोग्य मंत्री राजेश टोपे
आम्ही केंद्राकडे 5 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त 277 व्हेंटिलेटर्स मिळाले असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

संग्रहित छायाचित्र
सोलापूर : केंद्र सरकारकडे आम्ही 5 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. मात्र, केंद्राकडून फक्त 277 व्हेंटिलेटर मिळाले आहेत. तसेच राज्यशासनाने एकमताने ठराव केला होता की वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्गाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा अंर्तगत मूल्यमापन करुन गुण ठरवा. मात्र, प्रशिक्षित विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्या. हे केंद्र शासन करू शकतं, हा संपूर्ण देशासाठी महत्वाचा निर्णय होईल. मात्र, केंद्र सरकार हे लवकर करत नाहीये असा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. उलट हे न करण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच MBBS पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करण्यासंदर्भात MCI ने परवानगी द्यावी. असे केल्यास 3 हजार डॉक्टर्स उपलब्ध होतील. पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढतील या काळात डॉक्टरांची आवश्यकता असेल त्यामुळे देशहितासाठी पंतप्रधानांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मुंबईत आणखी हजार मृत्यू लपवल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं. जर आकडे लपवयाचेच असते तर नंतर जाहीर का केले असते? काही तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे असं होतं आहे. मात्र, हे होऊ नये, मी देखील हे खपवून घेणार नाही असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. त्यांना काही सूचना करायच्या असतील तर नक्कीच कराव्यात. मात्र, आरोग्याच्या क्षेत्रात राजकारण होऊ नये याची काळजी घेण्याची नक्कीच गरज असते अशी टीका देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरुन देखील त्यांनी नाव न घेता टीका केली. गोपीचंद पडळकर यांचा जो कोणी बोलवता धनी आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रच्या राजकारणाची एक वेगळी संस्कृती आहे. कोणाच्या तरी आड घेऊन चिखलफेक करण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा नवीन चुकीच्या गोष्टी काही होऊ नये ज्यामुळे महाराष्ट्राचं नावलौकिक खराब होईल, असे माझे मत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल कोणी तरी किरकोळ माणसाने बोलणं हे चुकीचे असल्याचे म्हणत पडळकर यांच्यावर निशाण साधला. तर जे ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लगाम लावला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी भाजपला दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
























