Exam : तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर, 15 आणि 16 ऑक्टोबरला परीक्षा
Health Department Recruitment : एबीपी माझाने रखडलेल्या या भरतीबाबतचे वृत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरतीला (Health Department Recruitment) अखेर सुरुवात झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणाऱ्या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरला गट क या पदांसाठी परीक्षा (Health Department Exam) घेतली जाणार असून पुढच्या 15 दिवसात त्यासंबंधी निकाल लावणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा (Health Department Exam) घेतली जाणार असून 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी केली जाईल. यासंबंधी नियुक्तांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. एबीपी माझाने रखडलेल्या या भरतीबाबतचे वृत काही दिवसांपूर्वी दिले होते.
रखडलेली मार्च 2019 च्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे (Health Department Recruitment) विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्च 2019 च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गट क मध्ये आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाईल. एबीपी माझाने (ABP Majha Impact) रखडलेल्या या भरतीबाबतचे वृत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचं समोर आलं. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- Hingoli : गरोदर महिलांना रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचण्यासाठी अडचणी, आ. संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील परिस्थिती
- Health Dept Recruitment : पेपरफुटीला पाच महिने, ना निकाल ना परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांचं उपोषण