एक्स्प्लोर

व्हीआयपींसाठी नवी फौज उभारा, पोलिसांना ताण नको, हायकोर्टाचे आदेश

मुंबई : पोलीस संरक्षण घेऊन त्याचे पैसे राजकीय नेते देत नसतील तर त्यांच्या पक्षांकडून हे पैसे वसूल करा, असे खडेबोल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला सुनावले. मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर व न्या. गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पोलीस हे सर्वांसाठी आहे. त्यांचा वापर केवळ व्हीआयपींसाठी करू नका. व्हीआयपींना सुरक्षा द्यायाची असेल तर दुसरी फौज तयार करा, असेही न्यायालयाने फटकारले. याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार काही राजकारण्यांनी 2005 पासून पोलीस संरक्षणाचे पैसे थकवले आहेत. तरीदेखील त्यांची पोलीस सुरक्षा शासनाने काढलेली नाही. पैसे देत नसतील तर त्या राजकारण्यांचे व व्हीआयपींचे पोलीस संरक्षण काढून घ्यायाला हवे. पोलीस संरक्षण घेऊनही त्याचे पैसे का दिले जात नाही, हे आम्हाला जाणून घ्यायाचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले. जीवाला धोका असलेल्यांनाच पोलीस संरक्षण दिलेले आहे. पोलीस संरक्षण घेणाऱ्यांकडून पैसे वसूल केले जाणारच आहेत, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांनी स्पष्ट केले. राजकारणी पोलीस संरक्षण घेऊनही त्याचे पैसे देत नसतील तर त्यांच्या पक्षाकडून हे पैसे वसूल करा, असे न्यायालयाने शासनाला फटकारले व ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. राजकारणी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पोलीस संरक्षण दिले जाते. याने पोलिसांवर अधिक ताण येतो. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी व तपासासाठी पोलिसांची फौज कमी पडते. त्यात पोलीस संरक्षण घेऊनही त्याचे पैसे दिले जात नाही. हे पैसे थकवणाऱ्यांच्या यादीत राजकारणी व अति महत्त्वाच्या व्य्नती आहेत. त्यांच्याकडून हे पैसे वसुल करावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनी पुनमिया यांनी दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने शुक्रवारी शासनाला चांगलेच फटकारले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Embed widget