एक्स्प्लोर

चार आठवड्यात फूड सेफ्टी कमिशन स्थापन करा, अन्यथा मुख्य सचिवांवर कारवाई : हायकोर्ट

साल 2013 मध्ये फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील कायदा तयार करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही झाली? असा सवाल करत येत्या चार आठवड्यात कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : साल 2013 मध्ये फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील कायदा तयार करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही झाली? असा सवाल करत येत्या चार आठवड्यात कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच चार आठवड्यात या आदेशांची पूर्तता न झाल्यास राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईची नोटीस काढू, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. अलका कांबळे यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठयापुढे सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान "सरकारी योजना, चिल्ड्रन होम, कारागृह, आश्रमशाळा, विकास प्रकल्प, इ. सार्व काही हायकोर्टानेच पाहायचं का? मग सरकार आणि त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी करतात काय?," असा उद्विग्न सवाल हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी याचसंदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आयोग निश्चित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार राज्य अन्न आयोग निर्माण करणं राज्य सरकारला बंधनकारक आहे. सार्वजनिकरित्या ज्या अन्न घटकांचे वितरण केले जाते, त्याबाबत निश्‍चित मार्गदर्शक तत्वे असणं अत्यावश्यक आहे. मात्र राज्य सरकारनं अद्याप याबाबत कार्यवाही केली नसल्यामुळे हायकोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. कार्यव्यस्ततेमुळे न्यायालय आयोगावर नियंत्रण करु शकणार नाही, मात्र सरकारने यावर तातडीने कार्यवाही करायला हवी, असे मत न्यायालयाने यापूर्वीच व्यक्त केले आहे. दुष्काळ, पूर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्न सुरक्षा आयोगाची प्रामुख्याने आवश्‍यकता असते. महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश आदी भागात दुष्काळ पडला होता. त्यावेळी याची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. गरीब गरजू नागरिकांना या आयोगामुळे आवश्‍यक अन्न घटक मिळण्यास सहाय्य मिळू शकेल, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget