एक्स्प्लोर

Hasan Mushrif : सलग सहाव्यांदा कागलचा गड राखणाऱ्या हसन मुश्रीफांची मंत्रीपदी वर्णी, सभापती, जिल्हा परिषद सदस्य आमदार ते मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कागल विधानसभा मतदारसंघाचे (Kagal Vidhan Sabha Constituency) आमदार हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलीय. जाणून घेऊयात हसन मुश्रीफांची राजकीय कारकिर्द.

Hasan Mushrif oath Taking  : आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा (oath taking ceremony) संपन्न झाला. यामध्ये तिन्ही पक्षाच्या 39 नेत्यांनी शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे (Kagal Vidhan Sabha Constituency) आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जाणून घेऊयात हसन मुश्रीफ यांची राजकीय कारकिर्द.

हसन मुश्रीफ यांची राजकीय कारकीर्द

नाव : नामदार श्री हसन मियालाल मुश्रीफ

जन्म दिनांक : 24 मार्च 1954

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

शिक्षण:- बी. ए. ऑनर्स

ज्ञात भाषा:- मराठी, हिंदी, इंग्रजी

पक्ष:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -अजित पवार गट

मतदार संघः- कागल, गडहिंग्लज, उत्तूर

राजकीय स्फूर्तीस्थान : दिवंगत यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंहराजे घाटगे, अजित पवार.

भुषविलेली पदे : 
     
सभापती, पंचायत समिती कागल
      
सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर
        
संस्थापक संचालक - श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल
        
संस्थापक व्हाईस चेअरमन- सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना,  सदाशिवनगर - हमीदवाडा.
      
उपाध्यक्ष : जिल्हा काँग्रेस कमिटी
         
20 नोव्हेंबर 1996 ते 25  नोव्हेंबर 1999 अखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच  सन 1985 ते 2009 अखेर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

ऑक्टोंबर 1999 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवड. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
            
जुलै 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री

ऑक्टोंबर 2004 मध्ये विधानसभेवर फेर निवड माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात 9 नोव्हेंबर 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
          
10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार संभाळला आहे.
         
22 ऑक्टोबर 2009 मध्ये विधानसभेवर तिसऱ्यांदा विक्रमी 46,412 मतांनी निवड. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री तसेच कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभेवर चौथ्यांदा निवड

21 मे 2015 पासून आजअखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
        
21 ऑक्टोंबर 2019 मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड
           
30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद
          
2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद वर्णी
       
23 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतमोजणीत 11, 879 मतांनी विजयी होऊन सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड.

हसन मुश्रीफ यांचे विशेष कार्य :

1) सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकूण घेवून त्यांचे प्रश्न सोडवणारा लोकनेता
         
2) कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदार संघात हजारो कोटींच्या निधीतून विकास कामे.
             
3)  2011 साली दुर्गम अशा सेनापती कापशी खोऱ्यातील बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे ऊंचच ऊंच डोंगरमाथ्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना ऊभारुन कृषी- औद्योगिक क्रांती केली.
            
4) आजतागायत विविध जाती- धर्माच्या देव-देवतांची 750 हून अधिक मंदीर बांधली.
            
5) संपूर्ण राज्यातील गोरगरीब रुग्णाना जिल्हयाच्या ठिकाणासह, पुणे, मुंबई येथील पंचतारांकीत, सप्ततारांकीत हॉस्पिटलमधून मोफत ऊपचार मिळावेत म्हणून पब्लीक ट्रस्ट ॲक्ट या कायद्यामध्ये बदल केला.
         
6) या कायद्याच्या आधाराने आजअखेर लाखो रुग्णांवर मोफत वैद्यकीय ऊपचार.
           
7) 1999 साली कागल-हुपरी ही पंचतारांकीत एमआयडीसी स्थापून ७० हजारांवर बेरोजगारांना रोजगार.
           
8) कोल्हापूरात शेंडापार्क येथे साकारत आहे राजर्षि शाहू महाराज वैद्यकीय नगरी...... तब्बल रु.1100 कोटी निधीतून 600 बेडचे सामान्य रुग्णालय, 250 बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल व 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल ही कामे सुरु आहेत.
       
9) कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदार संघात गेल्या 5 वर्षात आणली रु.7000 कोटींची विकास गंगा.

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)

महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)

भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 
अपक्ष- 2

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 02 March 2025Special Report |Sion Bridge | सायन पुलाचं काम आणखी किती थांब? स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रासEknath Shinde on Chair टीम जुनी आहे, खुर्च्यांची अदला बदल झाली, फक्त अजितदादांची खुर्ची सेम..एकच हशाCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Embed widget