एक्स्प्लोर

Harshawardhan Patil On dattatray Bharne : वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं; हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला

वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं असा टोला हर्षवर्धन पाटलांनी आमदार दत्तात्रय भरणेंना लगावला आहे.

पुणे : वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं, असा टोला हर्षवर्धन पाटलांनी (harshawardhan patil) आमदार दत्तात्रय भरणेंना (Dattatray Bharne) लगावला आहे. इंदापूर बाहेर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं कारण तालुक्याचं कर्तुत्वच तेवढं मोठं आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भरणेंवर निशाणा साधला आहे. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी माजी सहकार मंत्री कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यावर्षी कर्मयोगी साखर कारखाना शेतकऱ्यांना काटा पेमेंट देणार असल्याची घोषणा केली आहे. 

यासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना देखील टोले लगावले. बाहेर कुठे गेलो तर इंदापूर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं कारण तालुक्याचं कर्तुत्वच तेवढं मोठं आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला. 

शिवाय परवा माझा पाय फ्रॅक्चर झाला तर काही लोक त्यावर देखील बोलतात मात्र वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भरणे यांना खडेबोल सुनावले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला प्लॅस्टर असताना देखील हर्षवर्धन पाटील यांनी सभेला हजेरी लावली. कारण हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे यांच्यात कायम वाद?

हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी 2014मध्ये पराभव केला होता. 2019 साली कॉग्रेसने उमेदवारी न दिल्याने हर्षवर्धन पाटील यांची भाजपमध्ये प्रवेश केला होता. भरणे सातत्याने भरणे हर्षवर्धन पाटलांवर टीका करत असतात. 19 वर्ष तुमच्याकडे मंत्रीपद होतं. त्यावेळ तुम्ही तालुक्यात कोणता विकास केला, असा सवाल ते कायम उपस्थित करत असतात. अनेकदा भरणे हे नवरदेवासोबत घोड्यावर बसताना किंवा कबड्डी खेळताना बघायला मिळालं आहे. यावरुनच हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर निशाणा साधला आहे. 

सध्या महायुतीचं सरकार आहे. ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं होतं त्यावेळी निधी वाटपावरुन वादवादी झाली होती. त्यानंतरही निधी वाटपावरुन श्रेयवादाची लढाईदेखील बघायला मिळत होती. भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना झालेले सगळे विकास कामं आम्ही केले आहेत, असा दावा हर्षवर्धन पाटील करत होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं बघायला मिळालं आहे. 

हेही वाचा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: 'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...
'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...
Mumbai Goa Highway crocodile: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे काळ नदीतून बाहेर, प्राणीप्रेमींकडून सुटका
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे....
धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी 
धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी 
Bhushan Gavai: कोल्हापूर खंडपीठ देशातील सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड, लवकरच खंडपीठात रूपांतर करणार; राजर्षी शाहूंच्या भूमीतून शाहू आंबेडकरांना स्मरत सरन्यायाधीशांचा शब्द
कोल्हापूर खंडपीठ देशातील सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड, लवकरच खंडपीठात रूपांतर करणार; राजर्षी शाहूंच्या भूमीतून शाहू आंबेडकरांना स्मरत सरन्यायाधीशांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: 'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...
'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...
Mumbai Goa Highway crocodile: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे काळ नदीतून बाहेर, प्राणीप्रेमींकडून सुटका
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे....
धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी 
धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी 
Bhushan Gavai: कोल्हापूर खंडपीठ देशातील सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड, लवकरच खंडपीठात रूपांतर करणार; राजर्षी शाहूंच्या भूमीतून शाहू आंबेडकरांना स्मरत सरन्यायाधीशांचा शब्द
कोल्हापूर खंडपीठ देशातील सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड, लवकरच खंडपीठात रूपांतर करणार; राजर्षी शाहूंच्या भूमीतून शाहू आंबेडकरांना स्मरत सरन्यायाधीशांचा शब्द
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा NDA चा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जून खरगे यांना फोन, सूत्रांची माहिती
सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर होताच राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जून खरगेंना फोन फिरवला, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार?
BEST Employees Society Election:  बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, 24 तासांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीस, ब्रँड ठाकरेची जादू चालणार?
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, 24 तासांपूर्वी EOW कडून संचालकांना नोटीस, ब्रँड ठाकरेची जादू चालणार?
रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते; गोपीचंद पडळकरांचा पलटवार
रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते; गोपीचंद पडळकरांचा पलटवार
5 हजार कोटींचा घोटाळा, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; महायुतीचा आणखी एक मंत्री आमदारांच्या निशाण्यावर
5 हजार कोटींचा घोटाळा, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; महायुतीचा आणखी एक मंत्री आमदारांच्या निशाण्यावर
Embed widget