एक्स्प्लोर

Gyanvapi mosque : ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणासंदर्भात आज सुनावणी, निर्णय होण्याची शक्यता

ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज ज्ञानवापी मशिदीबाबतच्या सर्वेक्षणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Gyanvapi mosque Verdict :  ज्ञानवापी मशिदीबाबतच्या सर्वेक्षणासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सर्वेक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. अजय कुमार मिश्रा यांना न्यायालयीन आयुक्तपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने केली होती. मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेच्या मागणीवरून नवा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यामुळे यापुढे मशिदीचे सर्वेक्षण होणार की नाही? याशिवाय सर्व्हे करणारे कमिशनर बदलणार की नाही याबाबतचे निर्णय आज होणार आहेत.

दरम्यान, सलग तीन दिवस चाललेले सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून शनिवारी पाहणी पथक मशिदीच्या आत गेल्याने गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले होते.  मशीद व्यवस्थापनाकडून सर्व्हे कमिटीला शनिवारी मशिदीत प्रवेश करण्यास विरोध केला. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवावे लागले होते. या प्रकरणात हिंदू समाजाच्या वतीने मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेची मागणी केली जात आहे. त्यासाठी संपूर्ण संकुलाची पाहणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. हिंदू समाजाचे म्हणणे आहे की,  शृंगार गौरीच्या मूर्तीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मशिदीच्या आत जावे लागेल. त्यामुळेच पाहणी पथक वारंवार मशिदीच्या आत जाऊन सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
याबाबत मुस्लिम समाजाने दावा केला आहे की, मशिदीच्या पश्चिम भिंतीच्या बाहेर शृंगार गौरीची मूर्ती आहे. सर्वेक्षणाला कोणताही आक्षेप नाही. परंतु, सर्वेक्षण पथकाला मशिदीच्या आत जाण्यास आक्षेप आहे. न्यायालयाने मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले नाहीत. 

ज्ञानवापी मशिदीबाबतचा नवा वाद काय आहे?

ज्ञानवापी मशिदीचा नवा वाद जुन्या वादापेक्षा वेगळा आहे. नवा वाद मशिदीच्या आवारातील शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेच्या अधिकाराबाबत आहे. ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद 18 ऑगस्ट 2021 रोजी सुरु झाला आहे. यावेळी वाराणसीच्या पाच महिलांनी शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. परंपरेनुसार या ठिकाणी वर्षातून दोनदाच पूजा केली जात असे. मात्र आता मशिदीच्या आवारातील इतर देवतांच्या दैनंदिन पूजेला अडथळा येऊ नये, अशी या महिलांची मागणी आहे.

ज्ञानवापी मशिदीबाबत जुना वाद काय आहे?

1991 मध्ये ज्ञानवापी मशिदीच्या अस्तित्वाबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. ज्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली ती जागा काशी विश्वनाथची जमीन असून छोटी मंदिरे उद्ध्वस्त करून मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. हिंदू पक्षाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे चौकशी करण्याचे आवाहनही केले होते. यानंतर 9 सप्टेंबर 2021 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील एएसआयच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली. तेव्हापासून ही स्थिती कायम आहे. 

सर्वेक्षणाबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्ष आमनेसामने असल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. सर्वेक्षणासाठी गेल्या आठवड्यात दोन दिवस पथक मशिदीत पोहोचले, मात्र सर्वेक्षण होऊ शकले नाही. मशिदीच्या आत अनेक लोक उपस्थित असल्याचा हिंदू पक्षाने केल्यामुळे सर्वेक्षणावरून वाद सुरु आहे. सर्वेक्षणाच्या नावाखाली मशिदीच्या भिंतींचे नुकसान करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे. न्यायालयाने काल या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला असून आज निकाल अपेक्षित आहे. याप्रकरणी न्यायालयाचे आयुक्त बदलले जावेत, अशी मुस्लिम पक्षाची इच्छा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
Horoscope Today 15 May 2024 : आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
PM Modi Jiretop: प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 15 May 2024 : ABP MajhaGhatkopar Hoarding Collapse Special Report : होर्डिंग कोसळलं, माणसं दबली, कुटुंबांचा आधार हरपलाABP Majha Headlines : 06:30 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSachin Yadav Ghatkoper Hoarding : दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं बाळ; सचिनसोबत नियतीचा खेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
Horoscope Today 15 May 2024 : आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
PM Modi Jiretop: प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
Maharashtra News LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार
Maharashtra News LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget