एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गुढी उभारत केला नवा संकल्प; म्हणाले....

मोदीजींच्या नेतृत्वात आज नवा भारत जग पाहत आहे. उद्या प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची गुढी उभारणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.

Gudi Padwa 2024 Nagpur : मोदीजींच्या (PM Modi) नेतृत्वात नवा भारत आज जग पाहत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने भारतामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची गुढी आपण उभारणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे, असा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे. आज नागपुरात गुढी पाडाव्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यंदाचा गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा गुढीपाडवा आहे. कारण, आता पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम आपल्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले आहेत. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आपण दिवाळी साजरी केली आणि गुढीही उभारली. मात्र, त्यानंतर आमचे श्रीराम वर्षानुवर्ष या ठिकाणी अज्ञातवासात, वनवासात होते. मात्र, मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) विराजमान झालेत. म्हणून आता खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पुनर्जागणाच्या नवीन पर्वाला आज सुरुवात झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

सनातन हिंदू लोक आम्ही आहोत, हे सांगण्याची वेळ आलीय

सांस्कृतिक पुनर्जागणाच्या या नव्या पर्वात आता आपल्याला येणाऱ्या नवीन पिढीला आपला जाज्वल्य इतिहास, संस्कृति आणि समृद्ध अशी परंपरा सुपूर्द करायची आहे. त्यामध्ये मोगलांनी, इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही तर जगाच्या पाठीवरचा सगळ्यात जुना आणि वैभवशाली इतिहास आपल्याला सांगायचा आहे. कधीकाळी इतिहास आणि संस्कृतीतून डिलीट केलेली पाने आता नव्याने लिहायची आहे. आम्ही कधीही पराजित मानसिकतेतले लोक नाहीत. तर वर्षानुवर्षे ज्यांनी जगाला मार्गदर्शन केले, अशा भारतीय संस्कृतीतील सनातन हिंदू लोक आम्ही आहोत, हे सांगण्याची वेळ आता आल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपराजधानीत गुढीपाडव्याचा उत्साह 

आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असून आजपासून सुरु होणाऱ्या वर्षाला क्रोधीनाम संवत्सर असं म्हटलं जातं. शालीवाहन शके 1946 ची सुरुवात आजपासून झालीय. आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

गुडीपाडाव्याचा हाच उत्साह उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळतोय. नागपूरमध्ये सामुहिक रामरक्षा पठण आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सहभाग घेत सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्त माळी या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्राजक्ताने नागपुरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
Crime : दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
Team India : जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Suraj Chavan Rada | मारहाण प्रकरणी Suraj Chavan यांची दिलगिरी, गैरसमज दूर करणार
Latur Bandh | छावा संघटनेच्या Vijaykumar Ghadge यांना मारहाण, आज Latur बंद!
Mumbai Rains | पुणे, Mumbai मध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले, चाकरमान्यांना त्रास
Mumbai Heavy Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांमध्ये पाणी साचले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा CM देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींना फोन
Crime : दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
दहा वर्षांपूर्वी आईला मारल्याचा राग, नारळपाणी विक्रेत्याला प्लॅन करुन संपवलं, पण पार्टीतील टी शर्टमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली
Team India : जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
जसप्रीत बुमराह मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? मोहम्मद सिराजनं बातमी फोडली
Shivendraraje Bhosale on Chhava Sanghatna : छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा, म्हणाले, 'दादागिरी, जबरदस्ती चालणार नाही'
छावा संघटनेला शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा, म्हणाले, 'दादागिरी, जबरदस्ती चालणार नाही'
डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
त्रिभाषासूत्रीचा प्रश्न संसदेतील अधिवेशनात; महाराष्ट्र शासनाने GR रद्द केल्यानंतर केंद्राकडून भूमिका स्पष्ट
त्रिभाषासूत्रीचा प्रश्न संसदेतील अधिवेशनात; महाराष्ट्र शासनाने GR रद्द केल्यानंतर केंद्राकडून भूमिका स्पष्ट
हाती चाकू घेतलेल्या सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली; अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण, गुन्हा दाखल
हाती चाकू घेतलेल्या सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली; अल्पवयीन नसून 18 वर्षे पूर्ण, गुन्हा दाखल
Embed widget