नवरदेवाचा नाद खुळा! आपल्या वधुला नेण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरचं घेऊन आला
हौसेला मोल नसतं' असं म्हणतात. याचीच प्रचिती आता नाशिकच्या चांदवड तालूक्यातील राहूड ग्रामस्थांना देखील आली आहे. नवरीला नेण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरमधून आला आहे.
नाशिक : प्रत्येकाला आपल्या लग्नात काही तरी वेगळं करण्याची आणि मोठ्या थाटात लग्न करण्याची हौस असते. अशाच एका वराने चक्क वधूला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं आणल्याची घटना नाशिकच्या चांदवड तालूक्यातील राहूड येथे पहावयास मिळाली.
राहूड येथील डॉ.पल्लवी नारायण पवार हिचा विवाह सिन्नर तालूक्यातील मोहगाव येथील गोकुळ ज्ञानेश्वर भिसे याच्याशी ठरला. पल्लवी डॉक्टर तर मुलगा इंजिनीअर आणि उद्योगपती असल्याने विवाह सोहळा तितक्याच थाटामाटात होणार. मात्र नववधूला खास हेलिकॅप्टरने विवाहस्थळी घेऊन जायचे अशी वराची इच्छा मग काय पुणे येथून हेलिकॅप्टर बुक करण्यात आले. मग ते सिन्नरच्या मोहगाव येथे उतरल्यावर नवरदेवासह त्याच्या घरातील लोकांना घेऊन थेट चांदवडच्या राहूड येथे वधूच्या घराकडे पोहचले.
नवरदेव पोहोचताच नवरीकडच्या लोकांनी त्यांच स्वागत केले. काही वेळ नाचण्याचा आनंद ही घेतला. जेवण करुन वधूला घेऊन हेलिकॅप्टरमध्ये बसून दोघे नवदांपत्य नाशिक येथे पोहचले. या दोघांचा विवाह सोहळा उद्या नाशिकच्या ताज हॉटेल मध्ये होत असून आज त्यांच्या हळदीचा समारंभ होणार आहे.
एकूणच काय तर ऐरवी केवळ राजकीय नेत्यांना निवडणुकीच्या काळात हेलिकॅप्टर मध्ये येताना राहूडच्या ग्रामस्थांनी पाहिले. मात्र आज चक्क गावातील मुलीला तिच्या होणा-या पतीने नेण्यासाठी थेट हेलिकॅप्टरच आणल्याने गावक-यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती.
संबंधित बातम्या :