एक्स्प्लोर

Helicopter Bride I शेतकरी बापाकडून मुलीची सासरी हेलिकॉप्टरमधून पाठवणी

हौसेला मोल नसतं' असं म्हणतात. याचीच प्रचिती आता उपरीनंतर करमाळ्यातील ग्रामस्थांना देखील आली आहे. येथील शेतकरी बापाने आपल्या मुलीची सासरी पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधुन केली आहे.

पंढरपूर : तुळशी विवाहानंतर सगळीकडे लग्नसराई सुरु झाली असताना काही शेतकरी कुटुंबातील खास विवाहसोहळे लक्षवेधी ठरु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने हौसेखातर आपल्या मुलीची सासरी पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधुन केली होती. आता करमाळ्यातील शेतकऱ्यानेही आपल्या लाडक्या लेकीच्या पाठवणीसाठी हेलिकॉप्टर आणुन स्वप्नपुर्ती केली. हौसेला मोल नसतं' असं म्हणतात. याचीच प्रचिती करमाळ्यातील ग्रामस्थांना आली. करमाळ्यातील कंदरमधील शिवाजी पाटील यांची कन्या स्नेहल हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमधील कांतीलाल जामदार यांचे पुत्र अक्षय याच्याशी झाला. कंदरमधील शिवाजी पाटील हे शेतकरी वडिलोपार्जित शेतीचच काम करतात. मुलीचं लग्न ठरल्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह आठवणीत रहावा असा करण्याची त्यांची इच्छा होती. आपल्या मुलीला लग्नस्थळी पाठवण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बोलवले. मुलगी असली तरी तिची हौस करण्यात कुठेही कमी पडायचं नाही अशीच पाटील कुटुंबाची इच्छा होती. यासाठी सर्वसामान्यपणे कागदावर लग्नपत्रिका बनविण्याची प्रथा असताना पाटील यांनी रुमालावर लग्न पत्रिका तयार करुन वाटल्या होत्या. नुकतेच राज्यात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे नेते असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता शेतकरी ताठ मानेने उभा राहील, आम्हाला चांगले दिवस येतील. आमच्याही हौसेला मोल नाही. त्यामुळे मी मुलीला हेलिकॉप्टरने पाठवणी केली याचा आनंद आहे. उपरी येथेही हेलिकोप्टरने केली होती पाठवणी - उपरी येथील सराफी व्यावसायिक दत्तात्रय मोहिते यांनी मुलीच्या लग्नासाठी तिची पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधून केली. इवल्याशा गावात भलं-मोठं हेलिकॉप्टर उतरल्यामुळे, गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरभोवती गराडा घातला. वडील दत्तात्रय मोहिते यांनी पुणे येथून भाड्याने हेलिकॉप्टर आणलं. गावात हेलिकॉप्टरचा आवाज घुमताच गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली. मुलीची हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी पाठवण्याची घटना फारच क्वचित पाहायला मिळते. त्यात उपरीसारख्या ग्रामीण भागात तर या निमित्ताने इतिहासच घडला आहे. त्यामुळे उपरीवासियांना 'हौसेला मोल नसते' याचीच प्रचिती आली. संबंधित बातम्या : बापाच्या हौसेला मोल नाही, लग्नात मुलीची हेलिकॉप्टरमधून पाठवणी State News | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget