Gram Panchayat Election 2022 : खराटा आणि खटाऱ्याचा घोळ, सरपंच निवडणुकीत प्रचार केला खराट्याचा, प्रत्यक्ष बॅलेटवर आला खटारा!
Gram Panchayat Election 2022 : प्रचार केला खराटा चिन्हावर अन् बॅलेटवर आले खटारा चिन्ह अशी स्थिती अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत निर्माण झालीय. अमरावतीमधील या गोंधळाची आता राज्यभर चर्चा होतेय.
![Gram Panchayat Election 2022 : खराटा आणि खटाऱ्याचा घोळ, सरपंच निवडणुकीत प्रचार केला खराट्याचा, प्रत्यक्ष बॅलेटवर आला खटारा! gram panchayat election 2022 Confusion over election symbols in grampanchayat election post of sarpanch in amaravati Gram Panchayat Election 2022 : खराटा आणि खटाऱ्याचा घोळ, सरपंच निवडणुकीत प्रचार केला खराट्याचा, प्रत्यक्ष बॅलेटवर आला खटारा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/c39b6697ae0f68aaf47412e11c243b4d1671445734115328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati News Update : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. उमेदवाराने प्रचार केला खराटा चिन्हावर आणि मतदानादिवशी ईव्हीएम मशीनवर चित्र आले खटारा. या प्रकाराने संबंधित उमेदवाराने संताप व्यक्त करत तहसीलदारांकडे निवडणूक परत घेण्याची मागणी केलीय.
राज्यभरातील जवळपास सात हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यात देखील 257 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. परंतु, यावेळी अमरावतीच्या मेळघाटात मात्र चिन्ह दिलं एक अन् आलं दुसरं असाच प्रकार घडलाय. परंतु, या गोंधळाची आता राज्यभर चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कुठल्याच राजकीय पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही. परंतु, सरपंच पदाच्या उमेदवाराने स्वतःचे चिन्ह सोडून चक्क आप पक्षाच्या झाडू चिन्हावर प्रचार केला. परंतु, मतदानाच्या दिवशी त्याला बॅलेटवर खराटा सोडून खटारा चिन्ह दिसले. हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासह संपूर्ण गावच आश्चर्य व्यक्त करत आहे.
चिखलदरा तालुक्यात कोरडा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आदिवासींसाठी राखीव आहे. या पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये चितराम चंदन बेठेकर हे देखील होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी त्यांना देण्यात आलेल्या झाडू चिन्हावर जोरदार प्रचार देखील केला. काल सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांना बॅलेट दाखविण्यात आले. त्यावेळी चितराम यांना धक्काच बसला. कारण त्यांनी ज्या चिन्हावर प्रचार केला ते चिन्हच बॅलेटवर नव्हते. हा प्रकार पाहून चितराम यांच्या भुवया उंचावल्या. या प्रकारानंतर ते दिवसभर घरात बसून राहिले.
Gram Panchayat Election 2022 : नक्की काय झालं?
त्याचं झालं असं की, 9 तारखेला चितराम बेठेकर यांना एका अधिकाऱ्याने व्हाट्सअॅपवर पीडीएफ फाईल पाठवली. या फाईलमध्ये चितराम बेठेकर यांची निशाणी खराटा (झाडू) असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी संबंधिक अधिकाऱ्याला फोन करून मी तर खराटा मागितले नाही मग हे चिन्ह कसं काय दिलं? असा प्रश्न विचारला. त्यावर त्या अधिकाऱ्याने ऑनलाईन चिन्ह हेच आलं आता तुम्ही खराटा या चिन्हावरच प्रचार करा असे सांगितले. त्यानुसार चितराम बेठेकर यांनी खराटाचे पाम्पलेट छापून घरोघरी जाऊन खराटा निशानीचा प्रचार केला. पण मतदानाच्या दिवशी त्यांना कळलं की आपलं खराटा चिन्ह ईव्हीएन मशीनवर नाही. या सर्व प्रकारानंतर त्यांनी आपण खूप व्यथित झालो अशा भावना व्यक्त केल्या.
Gram Panchayat Election 2022 : निवडणूक परत घेण्याची मागणी
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर चितराम बेठेकर यांनी आज चिखलदरा गाठून तहसीलदारांकडे झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करून सरपंच पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. परंतु, आता चितराम यांना खराटा चिन्ह कोणी पाठवलं? याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Gram Panchayat Election 2022 : कुठं ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्वीक, तर कुठं बोगस मतदान, जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभरात कुठं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)