एक्स्प्लोर

गंगाखेड साखर कारखाना बोगस कर्ज प्रकरणी कारवाई का नाही : धनंजय मुंडे

शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप धनंजय मुंडेंनी केला.

मुंबई : साताऱ्याचे खासदार उदनयराजे भोसले यांना अटक करण्यात सरकारने तत्परता दाखवली. मात्र गंगाखेड कारखाना गैरव्यवहार प्रकरणी कारवाईला टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 50 शेतकऱ्यांना दररोज धमकी द्यायची, असं टार्गेट कारखान्याच्या 135 कर्मचाऱ्यांना दिलं. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा लागेल. कारण सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप धनंजय मुंडेंनी केला. दरम्यान या प्रकरणी दोषींवर कारवाई निश्चितपणे केली जाईल, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देताना सांगितलं. अजून एकही एफआयआर दाखल झाला नसल्याची माहितीही केसरकर यांनी दिली. काय आहे प्रकरण? परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात राहणाऱ्या अविनाश चौधरी यांची बारा एकर शेती आहे. आजपर्यंत त्यांनी कधीही बँकेकडे कर्जाची मागणी केली नाही. परंतु आज अविनाश चौधरींच्या नावे परभणीच्या सिंडीकेट बँकेचं तीन लाखाचं कर्ज आहे. गंगाखेडच्याच संजीवनी चौधरींची दहा एकर शेती आहे. चौधरी या माजी नगरसेविका आहेत. संजीवनी यांनी आपल्या पेट्रोल पंपासाठी कर्ज घेतलं आह, परंतु कधीही शेती कर्ज घेतलं नाही. आज त्यांच्या नावे नागपूरच्या आंध्र बँकेचं 2 लाख 85 हजाराचं कर्ज आहे. अरुण सानप यांच्या नावावर 10 एकर शेती आहे. सानपांनी गंगाखेडच्या बँक आँफ हैदराबादकडून 99 हजाराचं पीक कर्ज घेतलं होतं. सानपांच्या नावांवर त्यांना ज्ञात नसलेलं परभणीच्या बँक आँफ सिंडेकेटचं 1 लाख 18 हजार कर्ज आहे. नितीन चौधरींकडे 25 एकर शेती आहे. नितीन चौधरींनी आपल्या शेतीसाठी 90 हजारांचं कर्ज घेतलं होतं. नितीनरावांकडेही त्यांना ज्ञान नसलेलं परभणीच्या बँक आँफ सिंडीकेटचं तीन लाखाचं कर्ज आहे. गंगाखेड शुगर लिमिटेड माकणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टेंनी हा प्रताप केल्याचा संशय आहे. 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 15 हजार शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करुन पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकांतून 328 कोटींच कर्ज उचललं गेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा तडा लावण्याच्या प्रयत्नात गुट्टेंचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे आहेत. वर्षभरापूर्वी गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली. तेव्हा शेतकऱ्यांना सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंगाखेड पोलिस स्टेशनला तक्रारीचा अर्ज आला. परंतु चौकशी झाली नाही. त्यात मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचं उघड झालं. त्यानंतर आमदार मधुसूदन केंद्रे बँकांशी पत्रव्यवहार करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकांनी याला नकार दिला. फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, तर फसवलेल्या बँकांमध्ये परभणी सिंडीकेट बँक, युको बँकेच्या गंगाखेड, लातूर आणि नांदेडच्या शाखा, बँक आँफ इंडियाची अंबाजोगाई शाखा, आंध्र बँकेची नागपूर शाखा, युनाटेड बँकेची नागपूर शाखा आणि रत्नाकर बँक मुंबई या बँकांचा समावेश आहे. एरवी 50 हजारांसाठी शेतकऱ्यांना चकरा मारायला लावणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना मलिदा मिळाल्याशिवाय हे झालेलं नाही. खरं तर गंगाखेड शुगर हिमनगाचं टोक आहे. महाराष्ट्रात अनेक कारखान्यांनी हाच प्रताप केला आहे. न घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाल्यावर गंगाखेडच्या सात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिस महासंचालकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकांनाही केवायसी आणि ऑडिट रिपोर्ट घेऊन 25 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. कोण आहेत रत्नाकर गुटे? रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनिल हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत. रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुटे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या. बँकेचं नावं आणि कर्जाची रक्कम आंध्र बँक – 39.17 कोटी युको बँक – 47.78 कोटी युनायटेड बँक आँफ इंडिया – 76.32 कोटी बँक आँफ इंडिया – 77.59 कोटी सिंडिकेट बँक – 47.27 कोटी रत्नाकर बँक – 40.2 कोटी एकूण 328 कोटी

संबंधित बातमी :

शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटींचं कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा

माझ्यावरील आरोप राजकीय प्रेरित, चौकशीतून सत्य बाहेर येईल : रत्नाकर गुट्टे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget