एक्स्प्लोर
मुस्लिम भागातील बँक, ATMकडे जाणूनबुजून दुर्लक्ष: ओवेसी
लातूर: मुस्लिम भागातील एटीएममध्ये सरकार जाणूनबुजून पैसे टाकत नसल्याचं वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष असद्दुदीन औवेसी यांनी केलं आहे. लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
'नोटाबंदीचा निर्णय हा मुस्लिम समजाला तापदायक झाला आहे. मुस्लिम भागांमध्ये असणारी एटीएम रिकामी आहेत. इथल्या बँका उघडल्या जात नाहीत.जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे.' असे अनेक आरोप त्यांनी सरकारवर केले आहेत.
ओवेसींनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार टीका केली. 'मोदींनी लक्षात ठेवलं पाहिजे की, लोक आज पैसे काढण्यासाठी रांगेत उभे आहेत. तिच लोकं तुमच्या विरोधात मतदान (निवडणुकीत) करण्यासाठी पुन्हा एकदा रांगेत उभे राहतील.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement