एक्स्प्लोर

Congress-NCP | राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला, निवांत निर्णय घेऊ : शरद पवार

राज्यात लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी टीका केली. सरकार बनवायचं आहे की नाही यावर सविस्तर चर्चा करु, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आधी चर्चा होईल. आमच्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुढे शिवसेनेसोबत चर्चा करु, असं काँग्रेस नेते अहमत पटेल यांनी म्हटलं आहे. तर राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे, आता आम्ही निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. सर्वांशी चर्चा करुन कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरवला जाईल. सरकार झालं तर ते कसं चालेल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. सरकार बनवायचं आहे की नाही, बनवायचं असेल तर कोणत्या मुद्यांवर सरकार स्थापन करायचं याची चर्चा केली जाईल. राज्यपालांनी आता खूप वेळ दिलाय त्यामुळे काही घाई नाही, निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना काँग्रेसला नाही बोलावलं, हे चुकीचं : अहमद पटेल

राज्यात लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी टीका केली. याच सरकारने उत्तराखंड, गोवा सारख्या राज्यात मनमानी कारभार केला आहे. राष्ट्रपती राजवट लागू होणे, लोकशाहीची थट्टा आहे. राष्ट्रपती राजवट ज्या पद्धतीने लागू झाली, त्याचा निषेध करतो. या सरकारने मनमानी केली आहे. त्याची निंदा करावी तितकी कमी आहे, अशी टीका अहमद पटेल यांनी केली. राज्यपालांनी मोठे पक्ष म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं, मात्र काँग्रेसला बोलावलं नाही, हे चुकीचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु आणि पाठिंबा द्यायचा की नाही ठरवू, असं अहमद पटेल यांनी म्हटलं.

आम्हाला काल शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आला होता. सर्व महत्वपूर्ण निर्णयांवर सखोल चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर सखोल चर्चा झाल्यानंतर पुढची रणनिती स्पष्ट केली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget