'लाडकी बहीण' तर आता आली, पण सरकारच्या या 4 योजनाही देतात महिन्याला 1500 रुपये, तुम्हीही पात्र आहात?
Government Schemes Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील तरुणी आणि महिलांना या योजनेचा सध्या लाभ होतोय.
Government Schemes Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील तरुणींना आणि महिलांना या योजनेचा सध्या लाभ होतोय. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झालीये. 21 ते 60 वयोगटातील तरुणी आणि महिलांना या योजनेचा लाभ घेता येतोय. मात्र, यासाठी उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. वर्षाला 2,50,500 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असली तरी सरकारच्या 4 आणखी अशा योजना आहेत, ज्या तुम्हाला 1500 रुपये मिळवून देऊ शकतात. त्यासाठी पात्रता काय आहे? हे जाणून घेऊयात...
1. संजय गांधी निराधार अनुदान योजना - अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ
तुमच्या शेजारी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजरग्रस्त असणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य देणे, हा संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश आहे. विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, बेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटकांचा या योजनेत समावेश केला जाऊ शकतो.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती -
विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला - किमान 18 से 65 वर्ष (18 पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ ), किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला, दिव्यांग - जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान ४०%), अनाथ दाखला, दुर्धर आजार प्रमाणपत्र ,उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग - कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 50,000/-, आधार कार्ड रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी..
अर्ज कुठे करावा ?
तहसील कार्यालय, सेतु केंद्र,
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
2. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना - अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ
65 वर्षांवरील निराधार वृद्धांना श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे -
विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला - किमान 65 वर्ष, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.21,000/-), BPL नसलेले, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला ,अर्जदाराचा फोटो
अर्ज कुठे करावा ?
तहसील कार्यालय, सेतु केंद्र,
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना - अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ
सरकारची इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन ही योजना, तुमच्या आजूबाजूच्या निराधार आजी-आजोबांना महिन्याला इतके पैसे मिळवून देऊ शकते. 65 वर्षांवरील निराधार वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे -
विहीत नमुन्यातील अर्ज , वयाचा दाखला - किमान 65 वर्ष, दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण/ शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे), किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला ,अर्जदाराचा फोटो
अर्ज कुठे करावा ?
तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
4. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना - अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ
18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेल्या लोकांना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे -
विहीत नमुन्यातील अर्ज , अपांगत्वचा दाखला, दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे), किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र रहिवासी , आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी...
अर्ज कुठे करावा ?
तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
इतर महत्वाच्या बातम्या
अजित पवार ,वडेट्टीवार 10 वी पास, संतोष बांगर 4 थी पास, मग लिपिक भरतीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट का? दमानिया यांनी 10 आमदार-मंत्र्यांचं शिक्षण काढलं