औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर
राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर एकत्रितपणे मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच करण्याचे सांगितले.
मुंबई : औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच नियोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.
आज मंत्रालय येथे औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यावेळी आरोग्य विभागाच्या अवर सचिव डॉ. अर्चना वालझाडे यांच्यासह औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री यड्रावकर यांनी औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर एकत्रितपणे मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच करण्याचे सांगितले. औषध निर्माण अधिकारी हे पद एकाकी पद असल्याने यात काही धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी स्पष्ट केले. यड्रावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे औषध निर्माण अधिकाऱ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
WEB EXCLUSIVE | केज-अंबाजोगाईच्या कोविड रुग्णालयातील सीसीटीव्ही खरेदीत घोटाळा: आ. नमिता मुंदडा