एक्स्प्लोर
Advertisement
सरकार शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी आता गुजरातमधील सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी आता गुजरातमधील सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार असल्याची माहिती मिळतेय.
याविषयी 27 नोव्हेंबर 2018 च्या शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. यावेळी शिवस्मारक प्रकल्प सल्लागाराला 3-4 पर्याय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सल्लागारानं चार पर्यायांच्या छोट्या प्रतिकृतीही सरकारला सादर केल्या आहेत, मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही.
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभा असलेला देशातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उभा पुतळा बसवण्याचा विचार सध्या सरकार करत आहे.
मुंबईमधील अंधेरीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांचा उभा पुतळा आहे. त्याचप्रमाणे शिवस्माराकातील पुतळाही असण्याची शक्यता आहे. सल्लागाराकडून मागवण्यात आलेल्या चार पर्यायापैकी तीन पर्याय हे अश्वारुढ पुतळ्याच्या पायाच्या रचनेत छोटे बदल तर चौथ्या पर्यायामध्ये उभा पुतळा, असं देण्यात आलं आहे.
उभा पुतळा करायचं ठरल्यास त्याची उंची 153 मीटर (चबुतऱ्यासह 183 मीटर) करण्याचा विचार आहे. पटेलांच्या पुतळ्याची उंची 152 मीटर (चबुतऱ्यासह 182 मीटर ) आहे. एकूणच सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा एक मीटर उंच बांधला जाण्याची शक्यता आहे.
सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची 123.2 मीटर तर चबुतरा 88.8 मीटर आहे (एकूण 212 मीटर).
कसं असेल शिवस्मारक?
16 एकर जमीन
शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे. स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे. स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 2500 कोटी रुपयांपैकी 1200 कोटी रुपये हे शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्यासाठी असतील. मात्र प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्लॅन अजून निश्चित झालेला नाही. या टप्प्यात हेलिपॅड आणि आयमॅक्स थिएटर यांसारख्या सुविधा असाव्यात, असा प्रस्ताव आहे. शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत. संबंधित बातम्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचं काम ठप्प : विनायक मेटे शिवस्मारक रखडणार, काम सुरु न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवा, पीडब्लूडीचे कंत्राटदाराला आदेश अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मार्ग मोकळा शिवस्मारकासाठी पैसा कुठून आणणार? : हायकोर्ट शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्तावअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement