एक्स्प्लोर

सरकारच्या कंत्राटी जीआरची करणार होळी; राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून उद्या राज्यभरात आंदोलन

NCP : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून सरकारच्या कंत्राटी जीआरची होळी करून आंदोलन केले जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस (शरद पवार गट) उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहे. तर, राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून सरकारच्या कंत्राटी जीआरची होळी करून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी दिली आहे. 

याबाबत मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मुळात असंवैधानिक आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का? असे शेख म्हणाले. 

तसेच, अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. कुणाचं तरी उखळ पांढरं करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे असा याचा अर्थ होतो. एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही, म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची ही फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे. त्यामुळे या युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात राज्यातील प्रत्यक शहरातील मुख्य चौकात उद्या 18 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेख म्हणाले. 

असे असणार आंदोलन...

तसेच या आंदोलनात रिकाम्या खुर्च्यांवर कंत्राटी पंतप्रधान, कंत्राटी मुख्यमंत्री, कंत्राटी उपमुख्यमंत्री-1, कंत्राटी उपमुख्यमंत्री-2 आशा चिठ्या चिकटवू ठेऊन निदर्शने करण्यात येतील. त्या वेळी या शासनाच्या जीआरची होळी करण्यात येईल व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येतील. ज्यात, "रद्द करा रद्द करा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा.. रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा... भाजपा हटावा, नोकऱ्या वाचवा...कंत्राटी मुख्यमंत्री भरा पण नोकऱ्या परंमनंट करा...कंत्राटी सरकार हाय..हाय...रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा..भाजपा हटावा..नोकऱ्या वाचवा.., अशा घोषणा दिल्या जाणार असल्याचे शेख म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Sharad pawar Road Show In Pune : अजित पवारानंतर शरद पवार उतरणार मैदानात ; 'या' तारखेला पुण्यात करणार 'पावरफुल्ल' रोड शो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget