एक्स्प्लोर

Sharad pawar Road Show In Pune : अजित पवारानंतर शरद पवार उतरणार मैदानात ; 'या' तारखेला पुण्यात करणार 'पावरफुल्ल' रोड शो

उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता राष्ट्रवादीचे  शरद पवार पुण्यात रोड शो आणि जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर (ajit pawar) आता राष्ट्रवादीचे  शरद पवार (Sharad Pawar Group)  पुण्यात (pune) रोड शो (road show) आणि जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे. येत्या 27 ऑक्टोबरला शरद पवार (Sharad Pawar) पुणे दौऱ्यावर असणार आहे. याच दिवशी शरद पवार रोड शो करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी (Prashant Jagtap) दिली आहे.

येत्या काहीच दिवसांत पुण्यातील शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. याच बैठकीत या रोड शोचं आणि सभेचं पुढील नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबागेसमोरील गणेशकला क्रीडा या सभागृहात शरद पवारांची सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर शरद पवारदेखील रोड शो करत पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

आधी रोड शो नंतर सभा...

पुण्यात शरद पवारांचा गट आता अजित पवारांच्या गटाशी दोन हात करायला तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील शरद पवारांच्या रोड शोची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता शरद पवारांचा रोड शो पुण्यात कसा होतो आणि याच रोड शोचं सभेत रुपांतर होणार असल्याने शरद पवार सभेत अजित पवारांवर निशाणा साधणार का? कि ते पक्षबांधणीचा प्रयत्न कऱणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाचं वेगळं कार्यालय...

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलंबित करण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट दोन हात करायला सज्ज झाला आहे. यासाठीच शरद पवारांच्या गटाने पिंपरी-चिंचवड स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. काळेवाडी परिसरात हे कार्यालय उभारलं आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन केलं जाईल.

अजित पवारांचा पावरफुल्ल रोड शो....

काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामती आणि पुण्यात दोन ठिकाणी रोड शो केला होता. त्यावेळी हजारोंनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले होते. ढोल ताशा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहात अजित पवारांचा रोड शो पार पडला होता. त्यावेळी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात अभिषेकदेखील केला होता. 

इतर महत्वाची बातमी-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Senior Citizen  : समाजकल्याण विभागाच्या आश्वासनानंतरही संचालकाने वृद्धांना आणलं रस्त्यावर
Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
Mahapalikecha Mahasangram Nashik : काय आहेत नाशिकमधील उद्योजकांच्या अपेक्षा?
Mahapalikecha Mahasangram  Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?
Palghar Teacher Issue : शिक्षकाच्या मारहाणीला  घाबरून विद्यार्थी लपले थेट जंगलात, प्रकरण काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Home Buying Preparation : घर खरेदी करण्याचा विचार करताय? गृहकर्ज, डाऊनपेमेंट अन् ईएमआय, या गोष्टी लक्षात ठेवा
घर खरेदी करण्याचा विचार करताय? गृहकर्ज, डाऊनपेमेंट अन् ईएमआय, या गोष्टी लक्षात ठेवा
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, तयारीला वेग, निवडणूक आयोगानं दिलं वेळापत्रक, जाणून घ्या कसं?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, तयारीला वेग, निवडणूक आयोगानं दिलं वेळापत्रक, जाणून घ्या कसं?
Bihar Government: बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
Embed widget