Buldhana News : दिलासादायक बातमी! बुलढाण्यातील अंबा बरवा अभयारण्यात दोन वर्षात वाघांची संख्या झाली दुप्पट
Buldhana News : वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अभयारण्यात गेल्या दोन वर्षात वाघांची संख्या दुप्पट झाली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे
Buldhana News बुलढाणा : वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) अभयारण्यात गेल्या दोन वर्षात वाघांची संख्या (Tiger) दुप्पट झाली असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्राच्या लख्ख प्रकाशात बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि लोणार अशा तीन अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. रात्रीच्या लख्ख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची ही गणना अनुभवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात वन्यप्रेमींनी आपला सहभाग नोंदवला होता. या वन्यप्राणी गणनेत बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात आठ वाघांसह (Tiger) सात बछडे आढळले तर बिबट्यांची संख्याही लक्षणीय दिसून आली आहे.
दोन वर्षात वाघांची संख्या झाली दुप्पट
बुलढाणा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदा मिळाली आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि लोणार अशी तीन अभयारण्य लाभली आहेत. या तीनही अभयारण्यात अनेक प्रकारचे वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. या सर्व वन्य प्राण्यांची 23 मेच्या पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात गणना करण्यात आली. या तीनही अभयारण्यात जवळपास 45 मचानावर बसून ही गणना करण्यात आली. या गणनेत बुलढाणा जिल्ह्यातील या तीन अभयारण्यात विविध वन्य प्राणी आढळून आलेत.
यात आंबाबरवा अभयारण्यात 8 वाघ ज्यामध्ये 3 नर आणि 5 मादीचा समावेश आहे. तर 7 बच्छडे , अस्वल 10, नीलगाय 26, सांभर 29, भेडकी 11,आणि 12 रानगवे आढळून आले आहे.तर ज्ञानगंगा अभयारण्यात 20 बिबट, अस्वल 33, सायाळ 8, नीलगाय 165, चिंकारा 09 आणि खवले मांजर 02 आढळून आले आहे.
वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाच वातावरण
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाघांची संख्या जिल्ह्यातील अंबा बरवा अभयारण्यात अधिक आढळून आली आहे. गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात चार वाघ आढळून आले होते. मात्र यंदा ही संख्या आठ वर गेल्याने आणि यात अजून सात बछडे आढळून आल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाच वातावरण बघायला मिळालं आहे. वन्यजीव प्राणी गणनेसाठी यावर्षी वन्यजीव प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरासह स्थानिक वन्यप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी गणनेसाठी आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या अभयारण्यात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी अभयारण्यात दिसल्यामुळे वन्यप्रेमींनाही आनंद झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या