एक्स्प्लोर
एसटी कर्मचाऱ्यांना पगारासह वेतनवाढ, थकबाकीही 1 नोव्हेंबरला मिळणार
गेल्या वर्षी एन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी चार दिवसांचा संप केला होता.
धुळे : एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सण सुकर होण्यासाठी एसटी प्रशासनाने यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला अर्थात 1 नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरलाच होणाऱ्या पगारासोबत वेतन वाढ तसंच थकबाकीचे पाच हप्ते देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या सोबतच दिवाळी भेट म्हणून अडीच हजार रुपयेही मिळणार आहेत. यामुळे यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांना दुग्धशर्करा योग असेल.
गेल्या वर्षी एन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी चार दिवसांचा संप केला होता. साहजिकच याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला होता. या सर्व परिणामांचा एसटी प्रशासनाने बहुदा बोध घेत यंदा रिस्क नको म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणावा लागेल .
एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी या संदर्भात एका परिपत्रकान्वये सर्व विभागीय कार्यालयांना आदेश पारित केले आहेत. या आदेशात एसटी कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी सुकर होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन 1 नोव्हेंबरला करण्यात यावे. याच दिवशी वेतन वाढ थकबाकीचे पाच हप्तेही कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे.
एरव्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेला होत असतात. मात्र दिवाळीसारख्या सणाला एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचण उद्भवू नये याचा विचार बहुदा एसटी प्रशासनाने केलेला दिसत आहे. 5 नोव्हेंबर 2018 या दिवशी धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुकर होण्यासाठी एसटी प्रशासनाने यंदा प्रथमच एक तारखेला पगारासोबत वेतनवाढ थकबाकीचे पाच हप्ते देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतील हा दुग्धशर्करा योग आल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement