Gondia News : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध
Gondia 120 Students Unconscious : गोंदियातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ट्रकमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कोंबून भरल्याचं उघड झालं आहे. यामुळे श्वास गुदमरल्यानं 120 मुलं बेशुद्ध झाली आहेत.
Gondia 120 Students Unconscious Due to Suffocation : गोंदियातून (Gondia) एक संतापजनक घटना समोर आली आहे. गोंदियामध्ये एका ट्रकमध्ये अगदी जनावरांना भरतात तसं शाळेतील विद्यार्थ्यांना कोंबून भरून प्रवास केल्याचं उघड झालं आहे. यामुळे श्वास गुदमरल्यानं 120 मुलं बेशुद्ध झाली आहेत. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे.
गोंदिया येथील मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी न्यायचं होतं. यासाठी विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत नेताना ट्रकमधून नेण्यात आलं. या विद्यार्थ्यांना नेताना हलगर्जीपणा झाल्याचं उगड झालं आहे. विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये अक्षरश: कोंबण्यात आल्याचं समोर आलं. विद्यार्थ्यांच्या या ट्रकमधील प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ट्रकमध्ये विद्यार्थ्यांना कोंबल्यामुळे काही विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरला. यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले. ट्रकमध्ये श्वास गुदमरुन 120 विद्याथी बेशुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे शाळा प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा यामुळे समोर आला आहे.
LIVE UPDATES#BreakimgNews : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध, मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा#Gondia #Student #Maharashtra #Schollhttps://t.co/UbXHpmE3mz pic.twitter.com/UtnCD9YYsM
— ABP माझा (@abpmajhatv) September 25, 2022
पाहा व्हिडीओ : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबलं, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुध्द
जिल्हाधिकारी 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करणार
गोंदिया जिल्ह्यातील मंजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वाहतूक प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंजीतपूर येथील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा आटोपून परत येत असताना 127 विद्यार्थ्यांना एका ट्रकमधून कोंबून वाहतूक केल्यानंतर काही विद्यार्थी श्वास न घेता आल्याने गुदमरले होते. या विद्यार्थ्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे ट्रकमधून प्रवास करणे चिंताजनक बाब असून गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची संपूर्ण चौकशी करून तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. सोबतच आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाला अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा होऊ नये या साठी देखील निर्देश देण्यात येणार आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक निलंबित
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन निल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवुन घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी दिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या