एक्स्प्लोर
Advertisement
कोठडीतील महिलेशी अश्लील चाळे, पोलिसाला अटक
गोंदिया : पोलिस कोठडी भोगत असलेल्या आरोपी महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस शिपायाला अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावमध्ये ही घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी आरोपी पोलिस शिपायाला निलंबितही केलं आहे.
गोरेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जांभळी गावच्या जंगलात 31 जुलै रोजी एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. ओळख पटताच पोलिसांनी मृताच्या पत्नीसह आणखी तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावून त्यांना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. मृत निलेशची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं स्पष्ट झालं.
मात्र आरोपी महिलेची पाच महिन्याची मुलगीही तिच्यासोबत असल्याने तिला कारागृहात न ठेवता एका खोलीत ठेवण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत नाईट शिफ्टवर असलेल्या ग्यानिराम जिभकाटे या पोलिस शिपायाने आरोपी महिलेशी अश्लील चाळे केले. महिलेने याची तक्रार महिला पोलिसाकडे केली. महिला पोलिसाने याची माहिती निरीक्षकांना दिली. मात्र आरोपी पोलिस शिपाई असल्याने निरीक्षकांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करता याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पोलिश अधीकक्ष दिलीप भुजबळ-पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी ला ग्यानिराम जिभकाटेला निलंबित केलं.
मात्र तक्रारदार महिलाही आरोपी असल्याने तिने या संदर्भात गुन्हा दाखल केला नाही. मात्र ही बाब माध्यमांच्या निदर्शनास येताच पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती स्थापन केली. यानंतर महिलेचा जबाब नोंदवून आरोपी ग्यानिराम जिभकाटेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलिश ठाण्यात जर महिला सुरक्षित नसेल तर महिलांनी दाद मागायला जायचं कुठं?, असा प्रशन सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी केला आहे.
दरम्यान, आरोपीला पोलिस शिपायाने 1999 पूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यातील बागेत काम करणाऱ्या एका महिलेची छेड काढली होती. त्यावेळीही ग्यानिराम जिभकाटेला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने ग्यानिराम जिभकाटेची निर्दोष सुटका केल्याने त्याला पुन्हा नोकरीवर रुजू करण्यात आलं. पण आज पोलिस कोठडी भोगणाऱ्या महिलेशी अश्लील चाळे केल्याने त्याला पुन्हा अटक करुन निलंबित करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement