एक्स्प्लोर

गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग

गोंदिया : नक्षल्यांनी दिलेली धमकी गावकऱ्यांनी पाहिली नसती, तर गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुकमासारखाच हल्ला झाला असता. कारण याच फलकाच्या जवळ गोंदिया पोलिसांना नक्षल्यांनी पेरलेला टाईम बॉम्ब मिळाला. पोलिसांनी तातडीने अॅण्टीबॉम्ब स्क्वॉडला पाचारण केलं आणि बॉम्ब निकामी करण्यात आला. गावकऱ्यांच्या सतर्कतेनं आणि गोंदिया पोलिसांच्या तत्पर कारवाईनं मोठा अनर्थ तर टळला, पण पोलिसांना चिंता वेगळीच आहे. सुखाने नांदणाऱ्या समाजाला ग्रहण लावण्यासाठी नक्षली सदैव तत्पर असतात. पण तितकाच सतर्क समाज आणि पोलिस असतील, तर नक्षल्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. वेळीच कारवाई करुन अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या गोंदिया पोलिसांना सलाम. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात CRPF च्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते. गोंदियात पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांच्या मनसुब्यांना सुरुंग 25 जवानांच्या मृत्यूमागे कोण? नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील 25 जवानांच्या मृत्यूमागे कुख्यात नक्षली नेता हिडमा याचा हात असल्याचं बोललं जात आहे. हिडमाने जवळपास 300 नक्षलवाद्यांसह मिळून हा हल्ला केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पापल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला (PLGA) संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बुरकापाल आणि चिंतागुफा भागात सक्रिय असते. कोण आहे हिडमा? 25 वर्षीय हिडमा हा पीएलजीएची पहिली बटालियन (PLGA 1) चा प्रमुख आहे. तो सुकमा जिल्ह्यातील पालोडी गावाचा रहिवासी आहे. घातपाताने हल्ला करणारा मास्टरमाईंड अशी हिडमाची ओळख आहे. हिडमा आणि त्याच्या बटालियनने आतापर्यंत CRPF वर अनेक मोठे हल्ले केले आहेत. दंतेवाडातील ताडमेटलामध्ये 2010 साली झालेल्या हल्ल्यात एक हजार नक्षलवाद्यांनी 76 जवानांची हत्या केली होती. हिडमा ग्रुपने यापूर्वीही मोठे हल्ले केले आहेत. 23 मार्च 2013 रोजी दरभातील झीरम घाटीत काँग्रेस परिवर्तन रॅलीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह 31 जणांची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी

सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget