आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति तोळा दोन हजारांनी घट
जळगावच्या सुवर्णनगरीत देखील झाला असून गेल्या चार महिन्यातील सर्वात नीचांकी किंमत म्हणजेच 47 हजार रुपये इतकी कमी झाली आहे. गेल्या आठवडा भरात प्रतितोळा दोन हजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.
मुंबई : रुपयाच्या तुलनेत डॉलर वाढरल्यामुळे आणि जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात दिवसागणिक दर कमी होत असल्याचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत असून गेल्या आठवड्या भरात प्रति तोळा दोन हजार हजारांनी घट झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यातील नीचांकी दर सोन्याने गाठल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्ह्णून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळविल्याने कधी नव्हे ते 58 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर पोहोचले होते. वाढत्या दरामुळे सर्व सामान्य ग्राहक हा सोने खरेदीपासून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच संकट काहीसे कमी झाल्याने त्याच बरोबर रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारला असल्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत देखील झाला असून गेल्या चार महिन्यातील सर्वात नीचांकी किंमत म्हणजेच 47 हजार रुपये इतकी कमी झाली आहे. गेल्या आठवडा भरात प्रतितोळा दोन हजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. तर चांदीच्या दरात ही प्रतिकिलो पाच हजार रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी सुवर्ण नगरीत ग्राहकांनी गर्दी केली आहे.
सोन्याच्या दरात मागील काळात मोठी वाढ झालेली असल्याने अनेक सर्व सामान्य ग्राहक हे सोने खरेदी करण्यासाठी थांबून असल्याच पाहायला मिळत होते. मात्र सध्याच्या कमी झालेल्या सोन्याच्या किंमती पाहता अनेक ग्राहकांना ही संधी वाटू लागल्याने अनेकांनी याचा फायदा केला आहे. गुरुवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,480 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,480 रुपये इतका आहे. चांदीच्याही किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आज 69,500 रुपये मोजावे लागणार आहेत.