एक्स्प्लोर

अवकाळी पावसामुळे बकऱ्यांचा तुटवडा, राज्यभरातून मटण विक्रेते कल्याणमध्ये

एकीकडे मटण महागलेलं असताना दुसरीकडे पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात बकरेही मिळेना झाले. त्यामुळे आता इथल्या मटण विक्रेत्यांनी बकरे खरेदीसाठी कल्याणची बकरा मंडी गाठली. अचानक मागणी वाढल्यानं इथेही बकऱ्यांच्या तुटवडा भासू लागला आणि त्यामुळे इथेही बकऱ्यांचा भाव वाढला.

मुंबई : कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मटणाचे दर वाढलेले असताना यामागे बकऱ्यांचा दुष्काळ कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. कारण यंदा अवकाळी पावसामुळे बकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे राज्यभरातून मटण विक्रेते बकरे खरेदीसाठी कल्याणमध्ये दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही मटण विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली आहे. देशात राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात दरवर्षी बकऱ्यांचं सर्वाधिक उत्पादन होतं. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी अपुऱ्या खाद्यामुळे बकरे वजनात भरू शकले नाहीत, आणि त्याचा थेट परिणाम मटणाच्या विक्रीवर झाला. मटणाची आवक घटल्यानं दर गगनाला भिडले आणि सर्वसामान्यांच्या ताटातून मटण हद्दपार झालं. एकीकडे मटण महागलेलं असताना दुसरीकडे पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात बकरेही मिळेना झाले. त्यामुळे आता इथल्या मटण विक्रेत्यांनी बकरे खरेदीसाठी कल्याणची बकरा मंडी गाठली. अचानक मागणी वाढल्यानं इथेही बकऱ्यांच्या तुटवडा भासू लागला आणि त्यामुळे इथेही बकऱ्यांचा भाव वाढला. त्यामुळे इतक्या लांबून येऊनही शेवटी बकरे महागच पडत असल्यानं मटण व्यापारी हतबल झाले आहेत. या सगळ्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही बकरे महाग मिळू लागले असून उर्वरित महाराष्ट्रात असलेल्या बकऱ्यांच्या तुटवड्यामुळे कल्याण मंडीत बकऱ्यांची मागणी चांगलीच वाढली आहे. येत्या मार्च महिन्यानंतर नवीन बकरे बाजारात येतील तेव्हाच हे भाव कमी होऊ शकतील, असं बकरे विक्रेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं स्वस्तातलं मटण खाण्यासाठी किमान आणखी तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कोल्हापूरात मटणाचे दर 560 ते 580 रुपये प्रति किलो झाले तर बोंबाबोंब ही व्हायचीच. त्यामुळे वाढलेले हे दर कमी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना साकडे घातले होते. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशा आशयाची नोटीस मटण विक्रेत्यांना बजावली आहे. व्यावसायिकांनी नोटीसीला हायकोर्टात आव्हान देत अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की मटणाच्या दरावरून अशा प्रकारे दुकान बंद करण्याबाबत कोणतीही नोटीस बजावण्याचा ग्रामपंचायतींना अधिकारच नाही. हायकोर्टाने याची दखल घेत गारगोटी, कडगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश देत सुनावणी 12 जानेवारीरर्यंत तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget