एक्स्प्लोर

Aurangabad : औरंगाबादच्या नामकरणाबाबतची याचिका ऐकण्यास हायकोर्टाच्या मुंबई खंडपीठाचा नकार

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्तींपुढे झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं ही याचिका ऐकण्यास नकार दिला. 

मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. औरंगाबदचं स्वतंत्र खंडपीठ अस्तित्वात असताना ही याचिका औरंगाबाद खंडपीठानं ऐकणच योग्य राहील. असं स्पष्ट करत याचिकाकर्त्यांना औंरगाबाद खंडपीठापुढेच दाद मागण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिले आहेत.

काय आहे याचिका?

मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने साल 2001 मध्ये औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला होता मात्र, तो त्यावेळी हाणून पाडण्यात आला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने निव्वळ आपल्या राजकीय फायद्यासाठी बेकायदेशीररित्या आपल्या शेवटच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा प्रश्न घाईघाईत मार्गी लावला होता. त्यानंतर 16 जुलै रोजी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं याला स्थगिती देत काही तासांतच औरंगाबादचं नाव  पुन्हा बदलून संभाजीनगर करत असल्याचं जाहीर केलं. या सर्वबाबींकडे या याचिकेतून न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे.

राज्यघटनेच्या तरतुदींचा अवमान 

राज्य सरकारचा हा निर्णय राज्यघटनेतील तरतुदींचा अवमान करणारा असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. मराठा अथवा ब्रिटिश राजवटीतही कधी औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी कोणीही केलेली नाही. मात्र, शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांच्या स्थापनेनंतर या राजकीय पक्षांनी निव्वळ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक आणि सांप्रदायिक पद्धतीनं समाजाचं ध्रुवीकरण करण्यासाठी साल 1988 पासून औरंगाबादचं नाव बदलण्याचा घाट घातल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे. तसेच विद्यमान सरकार कोणतेही कारण नसताना औरंगाबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलेलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
अकोला देशातील सर्वात उष्ण शहर, तापमानाचा पारा 44 अंशावर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
अकोला देशातील सर्वात उष्ण शहर, तापमानाचा पारा 44 अंशावर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report
Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
Embed widget