एक्स्प्लोर
लेडीज डब्यात प्रवेशाला विरोध, धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं

कल्याण : गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणजवळ घडलेल्या घटनेत 22 वर्षीय तरुणी रेखा नवले जखमी झालेली आहे. कल्याण-ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. कल्याण स्टेशनला एका युवकाने जबरदस्ती लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेखा आणि तिच्या आईने या तरुणाला विरोध केला. त्यावेळी झालेल्या प्रतिकारात तरुणाने रेखाला ट्रेनबाहेर फेकलं. सध्या तिच्यावर कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेतर्फे कोणी जबाबदार व्यक्ती यावेळी डब्यात उपस्थित नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















