एक्स्प्लोर
अपघातानंतर वडिलांच्या मृतदेहाजवळ रात्रभर चिमुकली रस्त्यावर
बुलडाणा : वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांच्या मृतदेहाजवळच चिमुकलीने अख्खी रात्र जागून काढली. बुलडाण्यामध्ये ही हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय किशोर घडेकरला 16 ऑक्टोबरला मुलगा झाला. आपल्या नवजात बाळाला पाहण्यासाठी आणि पत्नीला भेटण्यासाठी किशोर घडेकर हे चार वर्षांची मुलगी काजलसोबत निघाले.
रविवारी संध्याकाळी दुचाकीवरुन ते मौजे गौलखेड गावाकडे निघाले होते. त्यावेळी मलकापूर शहराबाहेरील बोदवड मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली.
अपघातात किशोर घडेकर यांचा मृत्यू झाला, तर सोबत असलेली त्यांची चिमुरडी जखमी झाली. मात्र वडिलांचा मृत्यू झाल्याचं काजलच्या समजेपलिकडचं होतं. पित्याच्या मृतदेहाजवळच तिला अख्खी रात्र काढावी लागली.
या परिसरात रात्री वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने घडलेला प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. एका दूध विक्रेत्याने ही गोष्ट पाहून इतरांना घटनेची माहिती दिली. किशोर घडेकर यांचा मृतदेह आणि जखमी अवस्थेतील काजलला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
काजलच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं असून तिच्यावर मानस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मयत किशोरचा भाऊ ईश्वर घडेकरने दिलेल्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement