एक्स्प्लोर
हातात बंदूक घेऊन गिरीश महाजन नरभक्षक बिबट्याच्या शोधाला
वनाधिकारी असताना गिरीश महाजनांनी स्वतःचा जीव धोक्यात का घातला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव : जळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले होते. यावेळी महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली.
जळगावातील चाळीसगाव तालुक्यात वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरु होती. यावेळी नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले. महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली.
बिबट्या नरभक्षक झाल्याने त्याला मारण्याचे आदेश सरकारने दिल्याचं महाजन यांनी म्हटलं. मात्र बिबट्या आढळून आला नाही.
वनाधिकारी असताना गिरीश महाजनांनी स्वतःचा जीव धोक्यात का घातला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement