एक्स्प्लोर

दुष्काळी दौरा ठरवून 'संकटमोचक' पालकमंत्री न आल्याने ग्रामस्थांचा संताप

संध्याकाळपासून परिसरातील सात ते आठ गावातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी वाट पाहात थांबले होते. गावातील मंदिरात तशी तयारी करण्यात आली होती.

नांदगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी यासंदर्भातील उपाययोजनांना गती देण्यासह पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात आढावा घेण्याचे निर्देश यात दिले आहेत. या निर्देशानंतर मंत्र्यांनी देखील दौऱ्यांना सुरुवात केली आहे. VIDEO | अधिकारी ऐकत नाही, दुष्काळ दौऱ्यात मंत्री गिरीश महाजनांची हतबलता | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा मात्र या दौऱ्यांचे नियोजन योग्य होत नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा काल जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव येथे दुष्काळी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र दौरा पूर्ण करताना नांदगाव तालुक्यात येण्यास रात्री उशिर झाल्याने अखेर दौरा अर्धवट सोडून पालकमंत्री नाशिककडे निघून गेले. यामुळे पालकमंत्र्यांची वाट पाहात बसलेल्या नांदगावच्या हिसवळ येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या नाशिकच्या पालकमंत्र्यांनी सिन्नर येथून सकाळी दौऱ्याची सुरुवात केली. मात्र त्यानंतर येवल्यात पोहोचायला त्यांना दुपार उलटून गेली. दुपारी चारच्या दरम्यान नांदगावच्या हिसवळ बुद्रुक गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी त्यांची भेट ठरलेली होती. यासाठी संध्याकाळपासून परिसरातील सात ते आठ गावातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी वाट पाहात थांबले होते. गावातील मंदिरात तशी तयारी करण्यात आली होती. मात्र उशिर झाल्यामुळे पालकमंत्री हिसवळ येथे येणार नसल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्याने या ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. गावात जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची भीषण परिस्थिती असताना आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आतूर झालेल्या गावकऱ्यांना पालकमंत्री येणार नसल्याचं समजल्यावर चांगलाच हिरमोड झाला आणि तीव्र नाराजीही व्यक्त केली. नांदगाव-मनमाड रस्त्यावर असलेल्या या गावावरुन पालकमंत्र्यांचा जत्था नाशिककडे गेल्याने राजकीय संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालकमंत्र्यानी जनतेचे संकट ओळखले नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget