चंद्रकांतदादा म्हणाले, उचलायचं की नाही, आता गौतमी पाटील ढसाढसा रडत म्हणाली....
पुण्यातील नवले पूलावर झालेल्या अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. या प्रकरणावर गौतमी पाटीलने आज प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil : पुण्यातील नवले पूलावर झालेल्या अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या सर्व प्रकरणावर गौतमी पाटीलने प्रथमच भाष्य केलं आहे. मला ट्रोल केलं गेलं, पण गाडीत मी नव्हतेच. मला उगाच बदनाम केलं जात आहे, असं म्हणत गौतमी पाटील एबीपी माझावर ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.
विनाकारण या सगळ्या प्रकरणात मला ट्रोल केलं गेलं
गौतमी पाटीलने आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी होलताना ती म्हणाली की, ही गाडी फक्त माझी होती. माझा या सगळ्या अपघाताची काहीही संबंध नसल्याचे गौतमीने स्पष्ट केलं आहे. मी माझ्या खासगी कामासाठी दुसरीकडे होते, विनाकारण या सगळ्या प्रकरणात मला ट्रोल केलं गेलं आहे. पाच दिवस माझा मानसिक काही प्रमाणात छळ केला गेल्याचही गौतमी पाटीलने सांगितले. रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, मात्र अशा प्रकारे एखाद्याची प्रतिमा मलीन करणं हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असे गौतमी पाटील म्हणाली.
मी आता त्यांना कायद्यानुसारच उत्तर देणार
अपघातानंतर माझा मानलेला भाऊ त्या कुटुंबीयांशी भेटायला गेला होता. त्याने मदतीचा हात देखील पुढे केला होता. मात्र, कुटुंबियांनी आणि कायद्यानुसार जाऊ असे सांगितले आणि आमची मदत नाकारल्याचे गौतमी पाटील म्हणाली. त्याच्यानंतर मी त्या कुटुंबीयांच्या संपर्कात नाही, मी देखील त्यांच्यासोबत कायद्यानुसारच संपर्क साधणार असल्याचेही ती म्हणाली. इथून पुढे त्या कुटुंबीयांना जाऊन मला भेटायची इच्छा आहे, मात्र त्यांनी या तीन चार दिवसात जी काही माझी मीडियासमोर बदनामी केली आहे, त्यामुळं मी आता त्यांना कायद्यानुसारच उत्तर देणार असल्याचे गौतमी पाटील म्हणाली.
माझी यात प्रतिमा मलीन झाली
मंत्री चंद्रकांत पाटील यांची केलेल्या वक्तव्यावर देखील गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली. दादांनी अशी भाषा वापरली. मला वाईट वाटलं. मला त्यांना काही बोलायचं नाही. या गोष्टीशी माझा संबंध येत नाहीफक्त गाडी माझी आहे एवढाच संबंध असल्याचे गौतमी म्हणाली. मी गाडीत नव्हतेच, पण माझी यात प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांच्यामुळे मला भीती वाटली आणि मी काही केलंच नाही तर मी घाबरु कशाला असंही गौतमी म्हणाली. आता सगळं जे काही होईल ते कायदेनुसारच मी करणार असल्याचे गौतमी पाटील म्हणाली. ट्रोलर्स मला पहिल्या दिवसापासून ट्रोल करत आहेत. पण आता हे ट्रोलिंग कुठेतरी थांबायला हवं, ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नसलं तरी रोज नव्याने ट्रोल मी होत आहे, याचा मला प्रचंड त्रास होत असल्याचे गौतमी पाटील म्हणाली.
बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना कायद्यानुसार उत्तर देऊ : ॲड. हेमंत भांड पाटील
या सगळ्या प्रकरणात गौतमी पाटीलला बदनाम केले जात असल्याची माहिती गौतमीचे वकील ॲड. हेमंत भांड पाटील यांनी दिली. ज्यांनी कोणी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही कायद्यानुसार उत्तर देऊ असे भांड पाटील म्हणाले. त्यात कुटुंब असू देत किंवा कोणतेही राजकारणी असू देत त्यांना देखील आम्ही कायदेशीर उत्तर देऊ असे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
या अपघात प्रकरणाबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केलेल्या फोन कॉलमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील एका डीसीपीला “गौतमीला उचलायचं की नाही?” अशी विचारणा केल्याचे दिसत आहे
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती. ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघात प्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. या अपघाताच्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. मात्र, रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना (Pune Police) दिल्या होत्या. यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. त्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:


















