एक्स्प्लोर

कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं!

गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर गावपळण सुरु केली जाते. गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे.

सिंधुदुर्ग : आतापर्यंत तुम्ही पूर्ण गाव सुट्टीवर गेल्याचं कधी ऐकलंय का? नाही ना! मग आम्ही तुम्हाला कोकणातील एक अशा गावाची ओळख करुन देणार आहोत, जे वर्षातून एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं. तेही अगदी माणसांबरोबरच गुराढोरांसह. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. 80 ते 90 उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 400च्या वर आहे. मात्र सध्या हे गाव या लोकांच्या गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गेली चारशे वर्षांपासून गावपळणीची परंपरा येथील लोकं पाळत आले आहेत. म्हणूनच आपले घरदार सोडून गावाच्या वेशीबाहेर आलेल्या या लोकांनी आभाळाच्या छायेखालीच सात दिवसांसाठी आपला संसार थाटला आहे. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासीय गावात परततात. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! आता पूर्ण गावच वेशीबाहेर गेलंय म्हटल्यावर गावातील शाळा आणि अंगणवाडीही सहाजिकच याच ठिकाणी भरणार. विशेष म्हणजे विद्यार्थी दशेतील गावच्या पोरांना ही गावपळणीची प्रथा मजेशीर आणि त्यानिमित्ताने सहलीचा आनंद देणारी असते. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणं आणि त्यांचा आनंद घेणं निरंतर शक्य होईल. कोकणातील एक गाव सात दिवस सुट्टीवर, ग्रामस्थांनी गुराढोरांसह गाव सोडलं! गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर गावपळण सुरु केली जाते. गावपळण सुरु झाल्यानंतर कुणीही गावात जात नाहीत. कारण या दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते, असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. शिराळेवासियांचा आपल्या श्री.देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गावात 80 कुटुंब असून सुमारे 400 लोकसंख्या असणारं गाव आहे. तळकोकणात कुठे कुठे गावपळण परंपरा? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा आणि चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्‍ये शिराळे येथे आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. काही ठिकाणी दरवर्षी तर काही ठिकाणी तीन, पाच वर्षांनी गावपळण केली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget