एक्स्प्लोर
सैलानी बाबांच्या दर्ग्यात बाप्पांची प्रतिष्ठापना, 25 वर्षांची परंपरा
औरंगाबादः औरंगाबादजवळील पडेगावलगत असलेल्या सैलानी नगरात सैलानी बाबांच्या दर्ग्यात गणपती बाप्पाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. याच दर्ग्यात बाप्पाची आरती आणि नमाज पठणही होतं.
दर्ग्याची देखभाल हिंदू आणि मुस्लिमबांधव दोघेही करतात. फक्त गणेशोत्सवच नाही तर दर्ग्यात हिंदूचे इतर सणही साजरे केले जातात. सैलानी नगरात गेल्या 25 वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधवाच्या ऐक्याचं अनोखं दर्शन घडतंय.
किरकोळ कारणांहून हिंदू-मुस्लीम बाधंवातील तेढ वाढवण्याचं काम समाज कंटकांकडून केलं जातं. त्यामुळे धर्मावरुन भांडणं लावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना ही सणसणीत चपराक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement