एक्स्प्लोर
2 एकर शेतात पिकातून महागणपती, बाप्पाला पाहण्यासाठी ड्रोनचा वापर
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमध्ये गणेशभक्तांनी आगळावेगळा गणपती साकारला आहे, जो पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करावा लागतो.
औरंगाबाद : गणेशोत्सवात तुम्ही बाप्पाची वेगवेगळी रुपं पाहिली असतील. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमध्ये गणेशभक्तांनी आगळावेगळा गणपती साकारला आहे, जो पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करावा लागतो.
औरंगाबादेत 2 एकर शेतात पिकातून महागणपती साकारण्यात आला आहे . 200 फूट बाय 400 फूट उंचीची प्रतिमा पाहण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतून गर्दी होत आहे.
प्रतिमा एवढी भव्य आहे की, ती पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठाण गणेश मंडळाने खुलताबाद तालुक्यातील खीर्डी गावात 2 एकर शेतात पिकातून भव्य प्रतिमा निर्माण केली आहे.
यासाठी 25 किलो गहू, 10 किलो मक्का, 10 किलो ज्वारी, 10 किलो हरभराची दोन महिन्यांपूर्वी अशापद्धतीने पेरणी केली की आता पीक 3 फुटांपेक्षा अधिक उंच झाल्यावर त्याला महागणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. गणेशाचे डोळे, जानवे आणि हार तयार करण्यासाठी बेडशीट, घोंगडी, चादर, मल्चींग पेपर आणि फुले यांचा वापर करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement