एक्स्प्लोर

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची निवड

राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे आज सोपवली.

पुणे :  राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची सर्वानुमते आज निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे आज सोपवली. यावेळी डॉ. गणेश देवी म्हणाले, 'राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याजवळ लोकशाही समाजवाद आणि साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी आहे. सेवा दल कार्यकर्त्यांजवळ प्रगल्भता, कृतीशिलता आणि सभानता ही त्रिगुणसूत्री आहे. या वारशाच्या जोरावर देशातील लोकशाही समाजवाद मानणाऱ्या नागरिकांकडे जाऊन आपण त्यांना सेवा दलाशी जोडूया. समविचारी व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांची भक्कम एकजूट उभारून आपण फॅसिस्ट शक्तींशी लढूया. पुण्यात साने गुरुजी स्मारकावर सेवा दल मंडळाची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश परांजपे, विश्वस्त आमदार कपिल पाटील, अंजलीताई आंबेडकर, डॉ. झहीर काझी, सुरेखाताई दळवी, माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा, अरविंद कपोले, भरत लाटकर हे उपस्थितीत होते. निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून झाकीर अत्तार यांनी काम पाहिले. कोण आहेत डॉ. गणेश देवी? पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. तर दक्षिणायन चळवळीमुळे 13 राज्यं त्यांना आपला माणूस मानतात. भारतातील 750 भाषांमधील लोक त्यांना आपल्या बोली भाषांना सन्मान आणि अस्मिता देणारा प्रेरक मित्र मानतात. मराठीतील माध्यमं त्यांना ऋषीतुल्य म्हणून गौरवतात. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या 40 भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. समूहांची ओळख करुन देणारा भाषा शास्त्रज्ञ गणेश देवी. देशातील लुप्त होणाऱ्या शेकडो वंचित व भटक्या समाजाच्या भाषांना त्यांनी आपल्या कामाने संजीवनी दिली. देशातील 750 भाषांची नोंद करण्याचं संशोधनाचं ऐतिहासिक काम देवी यांनी त्यांच्या 3000 सहकारी अभ्यासकांच्या साथीने 3 वर्षात पूर्ण केलं. इंग्रजी भाषेचे प्रध्यापक म्हणून बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुरेखा देवी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञ आहेत. नोबेल प्रईज निवड समितीच्या केमिस्ट्री विभागात तज्ज्ञ सदस्य म्हणून सुरेखा देवींनी काम केलं आहे. इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे. पुणे जिल्ह्यातील भोर हे डॉ. गणेश देवी यांचं जन्मगाव. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्याचं उच्च शिक्षण झालं. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिड्समध्येही काही काळ त्यांनी शिक्षण घेतलं. मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत त्यांनी लेखन केलं. वानप्रस्थ (मराठी) आदिवासी जाने छे (गुजराती) अफ्टर अ‍ॅम्नेशिया (इंग्रजी) ही डॉ. गणेश देवी यांची पुस्तकं गाजली. 100 च्या वर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आणि संवर्धन करणारं मोलाचं काम डॉ. देवी यांनी केलं. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. साहित्य अकादमीचा देशपातळीवरील मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. देशात नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येनंतर अस्वस्थ होऊन डॉ. देवी यांनी दक्षिणायन ही चळवळ सुरु केली. त्यात देशभरातील हजारो लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सामिल झाले. विचारवंतांच्या हत्येचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीच्या चळवळीला चालनाही गणेश देवी यांनीच दिली. दक्षिणायन आता देशातली महत्वाची वैचारिक चळवळ बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Raigad Crime News: प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष, डॉक्टरकडून नर्सला छत्रीने मारहाण; पेण उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget